आंबेया डहाळीचं ठाण्यात प्रकाशन !

आंबेया डहाळीचं ठाण्यात प्रकाशन !

आंबेया डहाळीचं ठाण्यात प्रकाशन !

मराठी साहित्यसमीक्षा आणि संशोधनातलं महत्त्वाचं नाव असलेले डॉ. अनंत देशमुख यांच्या ‘आंबेया डहाळी’ या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन आज ठाण्यातल्या सहयोग मंदिर सभागृहात झाले.

ज्येष्ठ पत्रकार आणि विज्ञान लेखक श्रीराम शिधये यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. ज्येष्ठ कवी अशोक बागवे, कवी महेश केळुसकर, कवी अरूण म्हात्रे तसेच संस्कृत भाषा अभ्यासक धनश्री लेले, व्यास क्रिएशनचे निलेश गायकवाड, धनश्री प्रधान आणि लेखक अनंत देशमुख यांच्या उपस्थितीत या ललितबंधाचे प्रकाशन झाले.

डॉ. महेश केळुसकर यांनी आंबेया डहाळीतील निवडक ललित लेखांचे केलेले अभिवाचन हे प्रकाशन समारंभात लक्षवेधी होते. प्रकाशन सोहळ्याला मराठी साहित्यातील कवी, लेखक आणि जाणकार रसिक-श्रोत्यांनी उपस्थिती दर्शवली.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!