कोरोना लसीकरणाची वयोमर्यादा २५ हवी ; सोनिया गांधींची मागणी !

कोरोना लसीकरणाची वयोमर्यादा २५ हवी ; सोनिया गांधींची मागणी !

कोरोना लसीकरणाची वयोमर्यादा २५ हवी ; सोनिया गांधींची मागणी !

अस्थमा, मधुमेह आणि इतर आजारांनी ग्रस्त तरुणांना लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. कोरोना लसीकरणासाठीची वयोमर्यादा 25 वर्ष करावी, असं त्यांनी काॅंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत म्हटलं आहे.

कोरोना संकटाच्या सद्यस्थितीवरुन सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारलाही लक्ष्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत त्यांनी म्हटलं की, अनेक ठिकाणी लसी, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सची कमतरता भासत आहे. मात्र तरीही केंद्र सरकार गप्प आहे, भाजपाशासित आणि भाजपेतर सत्ता असलेल्या राज्यांभावत केंद्र सरकारचं धोरण दुजाभावाचं असल्याचा आरोपही गांधींनी केला.

सरकारने कोरोनाचा सामना करताना आरोग्य उपकरणं आणि औषधांवरील जीएसटी आकारणं बंद केलं पाहिजे तसंच कोरोना संकटात कडक निर्बंध लागल्यास गरीबांना प्रतिमहिना सहा हजार रुपयांची मदत सरकारने करणं आवश्यक आहे, अशा मागण्यासी सोनिया गांधी यांनी केल्या आहेत.

कोरोना व्हायरसमुळे हजारो लोकांचे मृत्यू होत आहेत, यावर सोनिया गांधी यांनी दु:ख व्यक्त केलं. संकट काळात आपलं कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना काँग्रेस पक्ष सलाम करतो, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!