तुम्हीच लिहा तुमच्या नव्या शक्यतांच्या कथा ; पुन्हा स्त्रीउवाच चं आवाहन !

तुम्हीच लिहा तुमच्या नव्या शक्यतांच्या कथा ; पुन्हा स्त्रीउवाच चं आवाहन !

तुम्हीच लिहा तुमच्या नव्या शक्यतांच्या कथा ; पुन्हा स्त्रीउवाच चं आवाहन !

रडक्या, सोशिक, त्यागमूर्ती नायिका आणि दुष्ट, स्वार्थी,पाताळयंत्री खलनायिका बघून कंटाळा आलाय ना? मग रिमोट सोडा आणि कीबोर्ड हातात घ्या. तुम्हीच लिहा नवीन कथा … उभी करा एखादी खंबीर स्त्रीवादी नायिका किंवा समतेवर विश्वास ठेवणारा एखादा समजदार नायक.

काय लिहायचं चटकन सुचत नाहीये का? मग ही घ्या एक छोटीशी गोष्ट. ही गोष्ट तशी ठोकळेबाजच आहे, पण ती तुम्ही तुम्हाला हवी तशी बदला. पाहिजे तर व्यक्तीरेखांमध्ये बदल करा, घटना बदला, तुम्हाला हवं तसं वळण गोष्टीला द्या. साधारण 1000 शब्दात मावणारी कथा लिहा.

मूळ कथा जरी एकच असली तरी तुमच्यापैकी प्रत्येकाची शैली वेगळी, ढंग वेगळा आणि दृष्टिकोनही वेगवेगळा असेल. एकाच ढाच्यावर आधारित कितीतरी नव्या गोष्टी वाचायला मिळतील. ही कथास्पर्धा नाही, इथं चूक बरोबर काही नाही. तुम्हाला फक्त एक अशी गोष्ट लिहायची आहे, ज्यात आहेत जीवनाचे निराळे ताणेबाणे आणि नव्या शक्यता!


दिनाकाकाच्या मागोमाग नंदिनी मुकाटपणे चालत होती. हवेलीच्या बाहेर काका थांबला, हात जोडत म्हणाला, “जा आत… घर वाचवलंस पोरी…” काका गेला.

राणासिंगच्या हवेलीत तिला काम तर मिळालं होतं. मांजी खुश असायच्या तिच्यावर. झाडलोट, सडा रांगोळी, गुरांना चारा, दूध काढणं, स्वयंपाक करणं – पण ह्या सगळ्यात तिला देवांसाठी फुलं काढून हार करणं हे काम खूप आवडायचं.

थोडी फुलं ती बाजूला ठेवायची. सगळं काम संपलं की ती फुलं घ्यायची, त्याचे हार करायची, नेत्रोबाला घालायची. तिला हलकं वाटायचं.

राणासिंगचं लग्न झालं होतं. त्याची बायको सरस्वतीदेवी दिवसभर खोलीत लोळत असायची. संध्याकाळी नटूनथटून मोटारीत बसून जायची. रात्री दोघे झिंगून परत यायचे. नंदिनीनं केलेलं खाल्लं तर खाल्लं ; नाहीतर खोलीत जाऊन झोपणं.

एका रात्री राणासिंग मोठमोठ्याने शिव्या घालत होता. नंदिनी घाबरली. पण गप जाऊन पडली. सरस्वतीदेवी आली, नंदिनीला उठवलं आणि खोलीत जा म्हणाली. नंदिनी थरथरत खोलीत गेली आणि दार लागलं.

असं वारंवार घडायला लागलं. आणि एक दिवस नंदिनीला देवासमोर उभं केलं. तिथे राणासिंग पण होता. बाजूला मांजी आणि सरस्वतीदेवी सुद्धा. नंदिनी – राणासिंगचं लग्न लागलं.

नंदिनीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आले. ती धावत नेत्रोबाकडे गेली. त्याच्या डोक्यावर पाय ठेवून आनंदाने रडली.

नंदिनीची काळजी घ्यायला आता इतर काही नोकर आले. नंदिनी खूप खुश होती. पलंगावरून खाली पण उतरायलां द्यायचे नाहीत ते. अगदी राणासिंग पण उतरू द्यायचे नाहीत. जे काय असेल ते पलंगावरच.

एक दिवस सरस्वती देवी आल्या. नंदिनीच्या पोटाच्या घेरावरून हात फिरवत म्हणाली, “मला जमलंच नसतं हे… Thanks to you…!!” नंदिनीला मूल झालं. अगदी नेत्रोबासारखं होतं ते. नंदिनी खुश झाली. सरस्वती देवी आल्या. तिचं मूल घेऊन गेल्या. मांजीसाहेब आल्या.

नंदिनीसमोर गोडाधोडाचं ताट ठेवलं – “खा लो… फिर हिवडा साफ करो”

नंदिनी उठली. अंगण झाडलं. सगळी कामं केली. फुलांचा हार केला. नेत्रोबाला घातला. “नेत्रोबा, असाच आशीर्वाद असू दे…” म्हणत जेवणातली बासुंदी तिनं नेत्रोबासमोर ठेवली.

तिथंच सावलीत शांत बसून राहिली.

 

लेखक – शार्दुल सराफ


सोबत दिलेली कथा तुम्हाला हवी तशी बदला आणि ‘पुन्हास्त्रीउवाच’ कडे 26फेब्रुवारी2021 पर्यन्त पाठवा.

punhastreeuvach@gmail.com तुमच्या कथा 1मार्च2021 पासून ‘पुन्हास्त्रीउवाच’ मध्ये प्रकाशित होतील. तुम्हाला भरपूर वाचकवर्ग मिळेल आणि वाचकांना नवनव्या ढंगाच्या कथा मिळतील. #गोष्टबदलाजगबदलेल

 

 

 

वंदना खरे

सामाजिक कार्यकर्त्या


विडिओ पाहण्यासाठी इथे टिचकी मारा :

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!