मुलींच्या पहिल्या शाळेचं राज्य स्मारक होणार ! भुजबळांचा पुढाकार ! सरकार सकारात्मक !!

मुलींच्या पहिल्या शाळेचं राज्य स्मारक होणार ! भुजबळांचा पुढाकार ! सरकार सकारात्मक !!

मुलींच्या पहिल्या शाळेचं राज्य स्मारक होणार ! भुजबळांचा पुढाकार ! सरकार सकारात्मक !!

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात सुरु केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची वास्तू असणारा भिडेवाडा स्मारकामध्ये रुपांतर करण्यासंदर्भातील बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आल्याची व सदरबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसंच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिलीय.

भिडेवाडा येथे फुले दाम्पत्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या वास्तुचं संवर्धन करण्यासाठी ती स्मारकामध्ये रुपांतरित करणं आवश्यक आहे. मात्र गेल्या दहा वर्षांपासून या प्रकरणात तोडगा निघालेला नव्हता. सांस्कृतिक कार्य विभागाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समितीचं गठन करावं अशी सूचना आज दिल्याबाबतचं ट्वीट भुजबळ यांनी केलं आहे.

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आवश्यक असणारी समिती नेमण्याबरोबर लवकरच यााबाबत पुढील बैठक बोलवण्यात येईल असं सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केलं.

फुले दाम्प्त्याने भिडेवाडा येथे सुरु केलेल्या मुलींच्या शाळेची वास्तू सांस्कृतिक कार्य, पुरातत्व विभागामार्फत राज्य स्मारक म्हणून घोषित करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचं अमित देशमुख यांनी सांगितलं.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!