यंदाचा झिम्माड महोत्सव माणगावात ; साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या युवा प्रेरणा भूमीत

यंदाचा झिम्माड महोत्सव माणगावात ; साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या युवा प्रेरणा भूमीत

यंदाचा झिम्माड महोत्सव माणगावात ; साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या युवा प्रेरणा भूमीत

महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्था आणि झिम्माड काव्यसमुहाचा अल्पावधीतच चर्चेत आलेला झिम्माड महोत्सव यंदा कोकणात माणगावच्या निसर्गरम्य अशा साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या युवा प्रेरणा भूमीत होतो आहे.‌ कवयित्री नीरजा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी ११ आॅगस्ट, २०१९ रोजी झिम्माड महोत्सव, २०१९ संपन्न होत असून, महाराष्ट्रातील अनेक मान्यवर कवी, कलावंत, साहित्यिक, विविध क्षेत्रातील नामवंत सहभागी होत आहेत. नामवंत लेखक दिग्दर्शक रवीन्द्र लाखे यंदाच्या झिम्माड महोत्सवाचे उद्घाटक आहेत, तर सिंधुदुर्गातील पत्रकारितेतील बहुचर्चित व्यक्तिमत्व कवी दिनेश केळुस्कर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. झिम्माड महोत्सवाचं यंदाचं तिसरं वर्ष आहे.

कवयित्री वृषाली विनायक यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या झिम्माड वाॅटस्एप समाजसमुहाने आता महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्थेच्या रूपात आकार घेतला आहे. उपलब्ध आधुनिक साधनांचा वापर करून झिम्माड ने अनेक नाविन्यपूर्ण साहित्यिक उपक्रम आपल्या समुहात कार्यान्वित केले. ऋतुरंग हा त्यापैकीच एक. समकालीन कवींनी समकालीन कवींच्या कवितांचं केलेलं रसग्रहण श्राव्य स्वरूपात आठवड्यातून एकदा समुहात सादर केलं गेलं. जणू रेडिओवरचा कार्यक्रमच सुरू आहे. या उपक्रमाने महाराष्ट्रातील एकमेकांना परिचित-अपरिचित कवीमंडळी एकमेकांशी जोडले गेले. त्यातूनच प्रत्यक्ष एकत्र भेटण्याच्या सूचना झाल्या व झिम्माड महोत्सव आकारास आला. मराठी कवितेचे गणगोत म्हणत वृषाली विनायक यांनी झिम्माड महोत्सवाची व्याप्ती आणि दिशा स्पष्ट केली.

सोशल मिडिया हातात आहे, तंत्रज्ञान खिशात! अशावेळी साहित्यचळवळ सुरू करणं फार सोप्पंय! गरज आहे ती सकारात्मक पद्धतीने विस्तारणं व मायेनं जपणं. कविता हा तुमच्या आमच्यातला दुवा आहे. तो जपूया! अहं कविताच जगूया!!!

वृषाली विनायक

पहिला झिम्माड महोत्सव पुण्यात एस. एम. जोशी फाऊंडेशनमध्ये आयोजित करण्यात आला होता. संगीतकार मिलिंद जोशी उद्घाटक होते. कवी भरत दौंडकर अध्यक्ष होते.

दुसऱ्या वर्षी सुदेश मालवणकर यांच्या सहकार्याने दापोलीत आयोजन केलं गेलं. लोकशाहीर संभाजी भगत यांनी झिम्माड महोत्सवाचं उद्घाटन केलं. कवी अजय कांडर अध्यक्ष होते. माणूसपण हीच कविता असते. माणूसपण संपलं की कविता संपते. हा सूर कवी अजय कांडर व लोकशाहीर संभाजी भगत यांच्या भाषणात घुमला.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम चित्रकार विजय बोधनकर यांनी पुण्यात तर रामदास खरे यांनी विशेष उपस्थिती दर्शवून दिवसभराच्या रंगसंगतीतून झिम्माड महोत्सव खुलवला. साहित्य-चित्र-संगीत अशी त्रीवेणी महोत्सवात अनुभवायला मिळते. विविध विषयांवरील औपचारिक अनौपचारिक चर्चांतून विचारांची देवाणघेवाण ही झिम्माडची ठळक बाजू आहे. कविसंमेलन ही तर एक पर्वणीच असते. झिम्माड या काव्यसमुहाने सोशल मिडियात सतत उपक्रमशील राहून कवितेचा परिघ विस्तारण्याचं काम केलंय. हे करत असताना समाजभान सदैव प्राधान्यावर ठेवलं आहे.

झिम्माड महोत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून झिम्माड सदस्य अगदी आवर्जून उपस्थित राहतात.‌ हा एक स्नेहमेळाच असतो. आदल्या दिवशीचं साहित्य सहलीचं वातावरण दुसऱ्या दिवशी साहित्य संमेलनाचं रुप घेतं. विशेष म्हणजे वैयक्तिक योगदानातून झिम्माड महोत्सव उभा राहतो.

यंदा शनिवार, १० आॅगस्ट रोजी सर्वजण साने गुरुजी स्मारकात जमणार आहेत. महाराष्ट्रातील विविध भागांतून सहभागी थेट माणगांवला येतीलच, पण मुंबई – ठाणे परिसरातील सहभागी सदस्य ठाणे शहरातून बसने एकत्र जाणार आहेत. झिम्माड महोत्सव कलावंत, साहित्यिकांसोबत रसिकांसाठीही खुला आहे. पण त्यासाठी ३१ जुलैपूर्वी आगाऊ नोंदणी करायची आहे.

चौकशी व सहभागासाठी :

वृषाली विनायक (९८३३६१४९०५),
अरूण गवळी (८६५५६१६०३८ ),
जितेंद्र लाड (९९६७९२९९११ )

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!