लोकचळवळ आरोग्य हक्कांची

लोकचळवळ आरोग्य हक्कांची

लोकचळवळ आरोग्य हक्कांची

कायद्याने वागा लोकचळवळ नागरिकांच्या संविधानिक हक्कांसाठी लढते. दैनंदिन जीवनातील प्रश्न, समस्या यांवर शासकीय यंत्रणेला जाब विचारते. सोबतच, नागरिकांचंही नियमकायद्यांच्या पालनाबाबत प्रबोधन करते.विविध क्षेत्रातील विविध विषय घेऊन कायद्याने वागा लोकचळवळ आपले कार्य करीत आहे. त्यातलाच एक महत्वाचा, नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे वैद्यकीय उपचार.
देशातील एक मोठी लोकसंख्या वैद्यकीय उपचारांच्या संभाव्य आवाक्याबाहेरच्या खर्चाने डॉक्टरांकडे जाणंच टाळतात. एकदा कधी गेलं तरी तितक्यापुरतंच तातडीचं. पुढच्या फेरीसाठी पैसे नसल्याने पुन्हा डॉक्टरला दाखवणं होतच नाही. कधी पैसे नाहीत म्हणून रुग्णांना प्राथमिक उपचार मिळत नाहीत, तर कधी पैसे संपले म्हणून रुग्णालयातून सुट्टी मिळत नाही. हा झाला गरीबांचा प्रश्न !! पण श्रीमंतानाही अवाढव्य खर्च करुन रोगनिवारणाची खात्री नाही. रुग्णालय जितकं प्रतिष्ठित, तितके उपचार अधिकाधिक महाग. खर्चाच्या वरच्या पातळीला काही मर्यादाच नाहीत. महागड्या तपासण्या, महागडे उपचार आणि महागड्या औषधांनी जगणंच महाग केलंय. इतक्या प्रमाणावर आर्थिक लूट होऊनही डॉक्टर्स कोणत्याच अपयशाची किंवा उपचारातील चुकीची जबाबदारी घेत नाहीत. उपचारातील निष्काळजीपणा रुग्णांच्या जीवावर बेतला, त्यांना आयुष्यातून उठवणारा ठरला, तरी हात सपशेल करण्याच्या डॉक्टरी प्रवृत्तीमुळेच रुग्ण आणि डॉक्टरांतील संघर्ष निर्माण झाला.
अलिकडच्या काळात तो अधिक तीव्र झाला, डोंबिवलीतील श्रेया निमोणकर प्रकरणात !! कायद्याने वागा लोकचळवळीच्या फोरम फॉर पेशंन्टस् राईटस् च्या माध्यमातून श्रेयाने तिची लढाई व्यापक केली, राज्यभर नेली आणि माध्यमांना या ज्वलंत विषयावर चर्चा घडवून आणायला भाग पाडलं.मेडिकल कौन्सिलच्या नियमांतील वैद्यकीय निष्काळजीपणाबाबत अभाव, रुग्णांच्या हक्कांबाबत अस्पष्टता, रुग्ण हक्क संरक्षण कायद्याची गरज, नर्सिंग होम एक्टची प्रभावी अंमलबजावणी अशा विविध विषयांबाबत कायद्याने वागा लोकचळवळीचा महाराष्ट सरकारशी पत्रव्यवहार सुरु आहे.
कायद्याने वागा लोकचळवळींतर्गत फोरम फॉर पेशंन्टस् राईटस् चं नेतृत्व करीत असताना श्रेया निमोणकर यांनी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर केला आणि पीडीत रुग्णांना एका मंचावर आणलं. ज्याची दखल सरकारी यंत्रणेलाही घ्यावीच लागली.कायद्याने वागा लोकचळवळीने श्रेया निमोणकर यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील संघर्षाची दखल घेत, त्यांना सावित्री पुरस्कार,२०१६प्रदान केला. श्रेया निमोणकर सद्या सेतू प्रतिष्ठानच्या माध्यमातून रुग्ण हक्कांवर स्वतंत्रपणे काम करताहेत. कायद्याने वागा लोकचळवळच्याफोरम फॉर पेशन्टस् राईटस् चं ध्येयधोरण, दिशा निश्चित करायची आहे. त्यासाठी आपणां सर्वांच्या मौलिक सूचना उपयोगात येणार आहेत. आपण आपली मतं kaydyanewaga@gmail.com या ईमेलवर जरुर पाठवावीत.

राज असरोंडकर, संस्थापक-अध्यक्ष,
कायद्याने वागा लोकचळवळ

admin

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!