“साने गुरुजी स्मारकातून प्रश्न विचारण्याची वृत्ती घेऊन जा”

“साने गुरुजी स्मारकातून प्रश्न विचारण्याची वृत्ती घेऊन जा”

“साने गुरुजी स्मारकातून प्रश्न विचारण्याची वृत्ती घेऊन जा”

प्रेरणा प्रबोधन शिबीर मालिकेच्या समारोप प्रसंगी उल्का महाजन यांचा शिबिरार्थींशी संवाद

साने गुरुजी राष्ट्रीय स्मरकामध्ये सुरु असलेल्या प्रेरणा प्रबोधन शिबीर मालिकेतील शेवटच्या बॅचसह सोमवारी १६ डिसेंबर रोजी शिबीर मालिकेचा समारोप झाला. सहभागी शाळा गो.म.वेदक तळा हायस्कुल व भिरा हायस्कुल मधील ८० उत्साही शिबिरार्थींनी शिबिराचे अनुभव सांगितले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवीन काहीतरी शिकल्याच समाधान होतंच आणि सोबतच शिबीर संपणार म्हणून डोळेही भरून येत होते.

दोन्ही शाळांच्या शिक्षकांनी मागील अनेक वर्षाप्रमाणे आम्ही पुढेही आमच्या शाळा दरवर्षी या शिबिरमालिकेत सहभागी करू अशी खात्री दिली.

यावर्षी या शिबीर मालिकेत आजपर्यंत एकूण १७ शाळा सहभागी झाल्या. पुढील २ महिन्यात आणखी ७-८ शाळा वेगवेगळ्या तारखांना येतील.

स्मारकाच्या वतीने किरण, धनराज, प्रफुल्ल आणि शिवानंद यांनी शिबिरातील नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले. तसेच या संपूर्ण शिबिरामालिकेत पर्यावरण या विषयावर संदेश कुलकर्णी यांनी, वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयासाठी नूरखान पठाण यांनी, नेचर ट्रेल साठी सागर मेस्त्री व सिस्केप टीमने, आकाश दर्शन साठी किरण मोरे यांनीं शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. संविधान या विषयावर सिरत सातपुते व राजवैभव यांनी संवाद साधला.


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!