साहसी स्वभाव होता शीला दिक्षित यांचा

साहसी स्वभाव होता शीला दिक्षित यांचा

साहसी स्वभाव होता शीला दिक्षित यांचा

 

शीला दीक्षित मूळच्या पंजाबच्या. दिल्लीत त्या लग्न झाल्यावर आल्या आणि दिल्लीच्याच झाल्या. विनोद दीक्षित यांच्यासोबत त्यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांचे सासरे उमाशंकर दीक्षित स्वतंत्रता सेनानी होते.‌ इंदिरा गांधींच्या सरकारात मंत्रीपद भूषवत असताना, दीक्षित यांचं शीला सांभाळायचा, त्याच काळात त्या इंदिरा गांधींच्या संपर्कात आलेल्या आणि तिथूनच त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. आमदारकी, खासदारकी, केंद्रीय मंत्रीपद, राज्यपाल पद त्यांनी भूषवलंय.‌ सलग तीनदा मुख्यमंत्री झालेल्या त्या देशातल्या पहिल्या राजकीय महिला आहेत.‌ दिल्लीचा चेहरामोहरा बदलण्याचं श्रेय शीला दीक्षित यांच्याकडे जातं. त्या कडक शिस्तीच्या होत्या. प्रसंगी मैदानात उतरणार ते काॅंग्रेसी नेतृत्व होतं.‌ घरी उदारमतवादी वातावरण असल्याने त्या खुल्या विचारांच्या होत्या. जातीयवादी विचारांना त्यांनी सातत्याने विरोध केला. त्यावर त्या नेहमी ठाम राहिल्या. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि अलिकडे त्या राहुल गांधींच्याही निकटवर्तीय होत्या. केजरीवाल यांच्याशी राजकीय तडजोड न करण्याचा निर्णय राहुल गांधींना शीला यांच्या दबावामुळेच घ्यावा लागला होता. शीला दीक्षित यांचा मूळ स्वभावच साहसी होता. काय ड्राईव्हींगमध्ये त्या तरबेज होत्या. उत्तरप्रदेशात महिलांवरील अत्याचाराविरोधात लढताना त्यांनी जेलही भोगली आहे.‌ मृत्यूसमयी त्यांचं वय ८१ वर्षं होतं, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा करारीपणा जराही ढळला नव्हता, अगदी विधानसभा आणि पाठोपाठच्या लोकसभा निवडणुका पराभवानंतरही !!!

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!