एका माखिजानीचा मराठीपणाकडचा प्रवास !

एका माखिजानीचा मराठीपणाकडचा प्रवास !

एका माखिजानीचा मराठीपणाकडचा प्रवास !

नमस्कार ! मी डॉ.चारुमित्रा रानडे ! पूर्वाश्रमीची माखिजानी !

माझे आई बाबा शिक्षक. हिंदी, सिंधी आणि इंग्रजी भाषा, साहित्य, कविता याचा व्यासंग असलेले व त्यामुळेच की काय, भाषा शुद्ध बोलली व लिहिली गेली पाहिजे, याचा आग्रह असलेले.

पुढे मेडिकल शिक्षण पोदार मेडिकलमध्ये झालं.
सर्व मराठमोळं वातावरण. मित्र, शिक्षक, पुस्तके, रुग्ण…सर्वच मराठी. मग तिथून मराठी आणि इथून हिंदी असा संवाद चालायचा. पण नंतर मराठी शिकावीच लागली

कारण मित्रांचे बोलणे असे….मैं घरसे बाहर गिरा सुबह,,,,!!! आम्ही विचारायचो, कैसा गिरा ,कहाँ लगा? मग कळाले की मी घराबाहेर पडलो, असा अर्थ होता…!

मराठी बोलायला लागले. मराठी गाणी, साहित्य,कविता,शायरी वाचन आणि ऐकणे सुरु झाले

पुढे रानडे कुटुंबामध्ये रुजताना सासुबाईंचे वाचन, बोलणे, संगीत, साहित्याची आवड मला पोषक ठरली. त्यांनी मला का?आणि कशाला? मधला फरक शिकवला. त्या सूचना करत असत, तर मी कशाला? असे विचारायची. त्यात कसा उर्मटपणा आहे, हे त्यांनी समजावून सांगितले.

त्यांचे वाक्प्रचार उत्तम आहेत. ते मी समजून घेतले. आईचे हिंदी आणि सासूबाईंचे मराठी वाकप्रचार किती समान आहेत !

पुढे पुढे मला मराठीतून लेख,व्याख्याने व सूत्रसंचालन करण्याचा आत्मविश्वास मिळाला. वपु , मेघना पेठे, गौरी देशपांडे,रविन्द्र पंढरीनाथ, जीए वाचलं. आजही मराठी गजल ,कविता शायर व कविमित्रांकडून समजून घेत असते. चांगले गायक व शायर मित्रमैत्रीणी आहेत, ही माझी मिळकत.

अजून खूप मुशाफिरी बाकी आहे. सिंधी कविताचा मराठी अनुवाद करण्याचा मानस आहे. बघूया ! नवीन पीढी मराठी बोलताना ऐकते, खूप त्रास होतो,
नॉय रे, पुस्तक नही भेटल मला??? अहो,माणसं भेटता, पुस्तक मिळालं, असं बोला ना??? पण गप्प बसते,,,,!!! Meet and found मध्ये फरक कराल कि नाही???

असो,,,मराठी दिनाच्या सदिच्छा !

 

 

डाॅ. चारूमित्रा रानडे

९९८७५६३९४७

MediaBharatNews

Related Posts
comments
  • मीना तीखे

    February 27, 2021 at 5:35 pm

    Dr charu makhijani ek चतुरस्त्र व्यक्ती असून मी त्यांना ओळखते अगदी कॉलेज days pasun …. Very down to earth and brilliant person … I am proud of her for this article and wish her lot of success stories ahead….

  • विलास जयंत देशपांडे.

    February 27, 2021 at 8:10 pm

    चारु ताई खूपच छान….

    सिंधी कवितांचा मराठी अनुवाद कराच,नव्हें ते तुम्हीं करालच.
    आमची विनंती आहे मराठीतील कविता पण सिंधी भाषेत अनुवाद करावीत.
    सिंधी समाज नक्कीच मराठी मनाच्या जवळ येईल.
    नाहीं का ??

    विलास जयंत देशपांडे.

  • leave a comment

    Create Account



    Log In Your Account



    Don`t copy text!