चिमुरड्यांशी लैंगिक चाळे करणारा माजलगावातील म्हातारा गजाआड !

चिमुरड्यांशी लैंगिक चाळे करणारा माजलगावातील म्हातारा गजाआड !

चिमुरड्यांशी लैंगिक चाळे करणारा माजलगावातील म्हातारा गजाआड !

किसन धावरे माजलगाव तालुक्यातील आनंदगावातील ६३ वर्षाचा वयोवृद्ध आहे. मुलंमुली, सुना, नातवंडं आहेत. स्वत:च्या नातवंडांशी कसा वागतो माहित नाही. पण प्रस्थापित समाजातून आल्याने त्याला गावातील गोरगरीबांची मुलं लैंगिक खेळणी वाटतात. त्यांच्याकडून स्वत:चं लिंग गोंजारून घेण्याचं विकृत व्यसन या म्हातारचळ लागलेल्या किसन धावरेला आहे. एका सहा वर्षाच्या मुलीसोबत चाळे करताना तो पकडला गेलाय. प्रकरण गंभीर आहे. पण पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ झाल्याचा आरोप होतोय ; तर फिर्यादी पोलिस ठाण्यात आलेच नाहीत, असा पोलिसांचा दावा आहे.

सहा वर्षांची ही चिमुरडी बहिणींसोबत हापशीवरून पाणी आणायला गेली होती. त्यावेळी संधी साधून किसन धावरे तिला जवळच्याच जिल्हा परिषद शाळेतील बाथरूममध्ये घेऊन गेला. पण शाळेच्या प्रांगणात खेळत असलेल्या मुलांनी त्याला पाहिलं. मुलगी घाबरून बाहेर पळाल्याचं पाहिल्यावर बघ्या मुलांनी मुलीच्या घरी कळवलं. मुलीच्या आई-वडिलांनी तिची विचारपूस केल्यावर मुलीकडून कळलेला प्रकार ऐकून त्यांना धक्का बसला.

पीडित समाज म्हणून गावात अल्पसंख्य ! आरोपी सामाजिकदृष्ट्या प्रस्थापित समाजातला ! तरीही हिंमत करून मुलीच्या वडिलांनी दिंद्रुड पोलिस ठाणे गाठलं. पण पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही.

१४ मार्चला दुपारी साडेतीन वाजता घडलेली घटना, गावातील सामाजिक कार्यकर्ता सुहास झोडगे यांच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल १७ मार्चला झाला. विनयभंग, बाल अत्याचाराच्या आरोपाखाली किसन धावरेला अटकही झाली. पण गुन्हा दाखल व्हायला चार दिवस का लागले, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी केलीय.

मुलीची केलेली विचारपूस व मुलीच्या आजीने दिलेली माहिती, यावरून आरोपीने गावातील इतर मुलामुलींशी लैंगिक चाळे केले असल्याची भीती सौंदरमल यांनी व्यक्त केलीय व सदर प्रकरणाच्या सखोल चौकशीचा आग्रह धरलाय.

दिंद्रुड पोलिसांनी मिडिया भारत न्यूज ला दिलेल्या माहितीनुसार, मुलींच्या भविष्याच्या विचार करून पालकांनी तक्रार देणं टाळलं होतं. दुसऱ्या दिवशी पीडित मुलीचे कुटुंब एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडूनच तक्रार यायला उशीर झाला. पोलिसांनी पालकांच्या फिर्यादीतही या विलंबाचा आवर्जून उल्लेख केलाय.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!