न्यू इंडियाच्या रामभक्तीने खेळातलं सौहार्दही केलं क्लीन बोल्ड !

न्यू इंडियाच्या रामभक्तीने खेळातलं सौहार्दही केलं क्लीन बोल्ड !

न्यू इंडियाच्या रामभक्तीने खेळातलं सौहार्दही केलं क्लीन बोल्ड !

वसीम जाफर आजही भारतीय कसोटी क्रिकेट आणि रणजी क्रिकेटमधील सगळ्यात यशस्वी खेळाडू म्हणून ओळखला जातात. भारतासाठी अनेक कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला आघाडीचा खेळाडू भारतीय वसीम जाफर यांच्या क्रीडा क्षमतेचं मूल्यमापन आता धार्मिक दृष्टीकोनातून होऊ लागलंय. अर्थात, न्यू इंडियात त्यात आश्चर्यकारक काही नसलं तरी आरोप झाल्यानंतर वसिम जाफर यांनी उत्तराखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

वसीम जाफर यांच्यावर क्रिकेट असोसिएशन अॉफ उत्तराखंड (सीएयु) मध्ये हस्तक्षेप करून मुस्लीम खेळाडूंना झुकतं माप दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. सीएयूचे सचिव महिम वर्मा आणि संघ व्यवस्थापक नवनीत मिश्रा यांनी वसीम जाफर यांच्यासोबत संघ निवडीवरून झालेल्या मतभेदांना धार्मिक रंग दिलाय.

वसीम यांनीच उत्तराखंड क्रिकेटचे स्लोगन ‘रामभक्त हनुमान की जय’ बदलून ‘गो उत्तराखंड’ केलं, असं या दोघांचं म्हणणं आहे. विसंगती ही आहे की खेळाच्या ठिकाणी ‘रामभक्त हनुमान की जय’ अशी घोषणा देणं धार्मिक नाही ; पण तशी घोषणा देण्यापासून रोखणं धार्मिक समजलं गेलं.

वसीम जाफर यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं आहे की खेळाच्या मैदानात कोणतेच धार्मिक स्लोगन असता कामा नये. रामभक्त हनुमान की जय या जागी अल्लाह हुं अकबर असंही मी केलेलं नाही. स्लोगन बदलण्यामागे केवळ खेळाडू वृत्ती होती; त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये.

जे आरोप करण्यात आलेले आहेत, ते अतिशय खालच्या पातळीवरचे असून खेळातही धार्मिक धुव्रीकरणाचा अजेंडा चालवण्याचा प्रकार असल्याचं वसीम जाफर यांनी म्हटलंय.

इकबाल अब्दुल्लाह या खेळाडूला जाणिवपूर्वक संघाचा कप्तान केल्याचा आरोपही वसीम यांच्यावर करण्यात आला खरा ; पण इकबालची निवड एकट्या वसीम जाफर यांनी केलेली नव्हती. निवड समितीत असलेल्या सर्वांच्या सहमतीने ही निवड झालेली होती, कारण हा इकबाल हा संघातील अनुभवी खेळाडू होता तसंच त्याच्याकडे आयपीएलचा अनुभव होता.

कॅप्टनपदासाठी माझी शिफारस जय बिष्ट याच्यासाठी होती, पण निवड समितीने इक्बालला पसंती दिली. मौलवींना मी कधीही निमंत्रित केलेलं नाही. मी राजीनामा दिला कारण, निवड समिती अपात्र खेळाडूंना निवडत होती. धार्मिक घोषणा बंद करून मी गो उत्तराखंड अशी घोषणा आणली. असा खुलासा वासीम जाफर यांनी ट्वीटरवर केला आहे. जर धर्माचाचा आधार घ्यायचा झाला असता तर शेवटच्या सामन्यात समद फल्लाह या खेळाडूला वगळलं नसतं ; तसंच मोहम्मद नाजिमही सगळे सामने खेळला असता, असंही वासीम यांनी म्हटलंय.

त्यावर उत्तर देताना अनिल कुंबळे आणि इरफान पठाण यांनी वासीम जाफर यांची सोबत केली आहे. झाला प्रकार व असा खुलासा करावा लागणं खेदजनक असल्याचं दोघांनी म्हटलं आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!