विज्ञान दिनी अंनिसने घेतला छद्म विज्ञानाचा समाचार !

विज्ञान दिनी अंनिसने घेतला छद्म विज्ञानाचा समाचार !

विज्ञान दिनी अंनिसने घेतला छद्म विज्ञानाचा समाचार !

अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टीकोणाचा प्रसार-प्रचार आणि व्यापक सामाजिक परिवर्तनासाठी काम करणार्‍या महा अंनिसच्या कल्याण शाखेतर्फे ‘विज्ञान दिन २०२१’चे आयोजन रविवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी फेसबुकवर ऑनलाइन स्वरुपात करण्यात आले. वर्तमान कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाइन स्वरुपात शाखेच्या ‘डॉ नरेंद्र दाभोळकर प्रेमी, ठाणे’ या फेसबुक पेजवरून प्रसारित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात कल्याण शाखेचे कार्याध्यक्ष राजेश देवरुखकर यांच्या प्रस्तावनेने झाली. त्यांनीच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात उपस्थित असलेले प्रमुख वक्ते वैज्ञानिक प्रा. डॉ. अनिकेत सुळे (सहयोगी प्राध्यापक, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई) यांचा परिचय महा अंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष गौतम जाधव यांनी करून दिला.

नंतर प्रा. डॉ. अनिकेत सुळे यांनी ‘आजच्या युगातील छद्म विज्ञान (Psuedo Science)’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला.

छद्म विज्ञान या विषयाची व्याख्या सोपी करून सांगताना डॉ. सुळे यांनी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या व्याख्यानांचे संदर्भ दिले. वैज्ञानिक पद्धती, वैज्ञानिक दृष्टीकोन, श्रद्धा इत्यादि विषयांची सरमिसळ करून जे गोंधळ माजविले जात आहेत याची अनेक उदाहरणे देऊन त्यांनी विषय स्पष्ट करून सांगितला. तसेच गेल्या काही काळात केल्या गेलेल्या अनेक छद्म-विज्ञान-आधारित हास्यास्पद दाव्यांचा त्यांनी तार्किकपणे आणि वैज्ञानिक आधारावर समाचार घेतला.

त्यांच्या व्याख्यानानंतर आरती हाटकर या कार्यकर्तीने उपस्थितांमधून आलेले प्रश्न वाचून दाखविले ज्यांना डॉ. सुळे यांनी समर्पक उत्तरे दिली. तानाजी सत्वधीर यांनी आभार प्रदर्शन केल्यानंतर कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह वर अनेक प्रेक्षकांनी पाहिला.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!