विद्वेष पसरवण्यासाठी आभासी धर्मांतराचा हलकट फंडा !

विद्वेष पसरवण्यासाठी आभासी धर्मांतराचा हलकट फंडा !

विद्वेष पसरवण्यासाठी आभासी धर्मांतराचा हलकट फंडा !

कर्नाटकातला मुस्ताक अली हिंदू धर्मियांच्या विरोधात फेसबुकवर सातत्याने विद्वेषी मजकूर प्रसारित करत होता. त्यामुळे तणावाचं वातावरण बनलं होतं. हिंदुत्ववादी संघटनांनी हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणला. पण झालं भलतंच. पोलिस तपासात उघड झालं की यामागचा मूळ मेंदू सिद्धरूध श्रीकांत नेरळे याचा आहे. पोलिसांनी नेरळेला अटक केली. पण मुश्ताक अलीचं काय झालं ? पोलिसांना सत्य समजलं तेव्हा त्यांना अजिबात आश्चर्य वाटलं नाही. धर्मांध विद्वेषी हा फंडा कायम वापरत आले आहेत.

कर्नाटकातील सीईएन अर्थात सायबर, इलेक्ट्रॉनिक्स, नार्कोटिक्स विभागाच्या पोलिसांनी मुश्ताक अलीला हुडकून काढलं. फेसबुकवर बागलकोटचा रहिवास दर्शवणारा मुश्ताक प्रत्यक्षात बेळगावातील गोकाक तालुक्यातला निघाला. फेसबुकवर मुस्लिम पेहरावात वावरणाऱ्या मुश्ताकचं प्रत्यक्ष दर्शन वेगळं होतं. इथे तो तिलकधारी होता. त्याचं नावही मुश्ताक नव्हतं.

मूळात मुश्ताक अली नावाची कोणी व्यक्तीच बागलकोटमध्ये नव्हती ; तर तो होता सिद्धरूध श्रीकांत नेरळे !

होय सिद्धरूधच मुश्ताक बनून स्वत:च्याच धर्माची बदनामी करत होता. स्वतःच्या श्रद्धा स्वत:च दुखावत होता. स्वत:ला पूज्य देवदेवतांच्या विरोधात स्वत:च आक्षेपार्ह लिखाण करत होता. पण ते करण्यापूर्वी त्याने आभासी धर्मांतर केलं होतं. मुश्ताक नाव धारण केलं होतं. जेणेकरून हिंदुंमध्ये मुस्लिमांविरोधात रोष, संताप निर्माण होईल, कारण इथे कोणाला कसलीच खातरजमा करायला फुरसत नाहीये.

कोणी हिंदू हिंदू धर्माविरोधात लिहिणारच नाही, याबाबत हिंदू कमालीचे ठाम असतात. त्याचा गैरफायदा सिद्धरूधसारखे समाजद्रोही घेत असतात. पण तो कोणी का असेना, त्या निमित्ताने मुस्लिमांविरोधात गरळ ओकायची संधी साधता येते.

बागलकोटचे पोलिस अधीक्षक लोकेश जगलसर म्हणतात की लोकांनी समाजमाध्यमांबाबत सावध असायला हवं.‌ तिथे जे पसरवलं जातंय ते सत्य असेलच याची खात्री नसते. कोणतीही खातरजमा न करता कोणी विद्वेष पसरवण्याचा हेतूत: तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचे उलट परिणामही भोगावे लागणार याची जाणीव हवी.

 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!