एक सुखद अनुभव, तोही कोविड सेंटरचा !

एक सुखद अनुभव, तोही कोविड सेंटरचा !

एक सुखद अनुभव, तोही कोविड सेंटरचा !

कुठे कसा संपर्क आला, माहीत नाही….त्रास काहीच नव्हता .चव गेली, वास येणं बंद झालं… शंका म्हणून तपासणी केली आणि….. रिपोर्ट positive…!!!

गेल्या वर्षभरापासून कोव्हिड संकट आपल्या सभोवताली घोंघावत आहे. याही परिस्थितीत जमेल तसं कार्यरत होतो. जराही काही जाणवलं तरी लगेच तपासणी प्रत्येक वेळी करून घेतली.

अत्यावश्यक सेवेतील प्रोजेक्टवर कार्यरत होऊन महिना होत आला, रुजू झाल्या झाल्या कोल्हापूर जिल्ह्यात लस देखील घेतली. पुढे कोल्हापूर गोवा आणि मग रत्नागिरी जिल्हा असा प्रवास. कुठे कसा संपर्क आला, माहीत नाही….त्रास काहीच नव्हता .चव गेली, वास येणं बंद झालं… शंका म्हणून तपासणी केली आणि….. रिपोर्ट positive…

आचार्य कुटुंबियांच्या संपर्कातून रायपाटन, लांजा येथे विलागीकरणासाठी गेलो…जाताना अनेक विचार मनात येत होते,

मुळात रत्नागिरीजवळ असताना या आदनिड ठिकाणी का चाललोय? ऑक्सिजन लेव्हल खाली आली तर इथे उपलब्ध होईल का? Ventilator असेल का.. एक ना अनेक विचार..घरच्या आठवणीने रडणं थांबत नव्हतं…दोन तासांनी रायपाटन सेंटर ला आलो… आणि आत आल्या आल्या व्यवस्था बघून रिलॅक्स वाटू लागलं….

स्वच्छ, सोयीसुविधांनी युक्त, पेशंट ची मनापासून काळजी घेणारे कर्मचारी, वेळच्या वेळी योग्य त्या आहार, तपासणी यामुळे निर्धास्त होत गेलो..

५ व्या दिवशी डॉ. बुद्धभूषण सोनवणे आणि डॉ.तन्वी जगताप इथे रुजू झाले…येताच क्षणी त्यांनी माहौल बदलवून टाकला..

प्रत्येक पेशंट ची वैयक्तिक काळजी चौकशी करणं याच बरोबर, सेंटर मधील वातावरण आनंदी ठेवण्यासठी काय करता येईल याचा सतत विचार…याबाबत आम्ही चर्चा केली आणि पुढाकार घ्यावा असं ठरलं…

रोज संध्याकाळी शारीरिक अंतर राखून विविध खेळ, गाणी, अंताक्षरी, अनुभव कथन हा उपक्रम सुरू केला..बघता बघता वातावरण बदलून गेले,

सर्वजण एकमेकाशी काळजी घेत, जेवणासाठी आग्रह करत, यामुळे आपण कोव्हिड positive होऊन सेंटर मध्ये आहोत, हेच विसरून गेलो..

सुरुवातीला इतके दिवस कसे जातील याचा विचार होता नंतर दिवस संपले कधी कुणालाच जाणवलं नाही. जणू आम्ही एखाद्या शिबिराला आलो आहोत आणि एक कुटुंब आहोत, इतकी काळजी सर्वजण घेत.. यात संपूर्ण कर्मचारी, डॉक्टर्स यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे त्यांनी ही स्पेस तयार करून दिली.

शेवटच्या दिवशी निघण्याची इच्छा कुणाचीच होत नव्हती, घरापासून लांब आणि अश्या कठीण काळात अशी माणसं भेटली. त्यांचा निरोप घेणं खरंच अवघड जात होतं. या सगळ्यामध्ये स्थानिक प्रशासन, शासकीय सुविधा यांबद्दलचा आणखी एक सुखद अनुभव आला..

सर्वांचे ऋणात आहे. इतकंच !!!

 

 

 

 

राकेश पद्माकर मीना

राज्य संघटक, कायद्याने वागा लोकचळवळ

MediaBharatNews

Related Posts
comments
 • Asmita Abhyankar

  May 27, 2021 at 6:46 pm

  आम्हालाही सरकारी कोविड ( ऊल्हासनगर-४ येथील ) इस्पितळात असाच अनुभव आला.
  …..

 • leave a comment

  Create Account  Log In Your Account  Don`t copy text!