भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेली लोकचळवळ !

भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेली लोकचळवळ !

भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेली लोकचळवळ !

मी सिद्धार्थ एकमल्ले ! चळवळीतला छोटासा शिकाऊ कार्यकर्ता ! आजवर परिवर्तनाच्या आशेने अनेक निवासी शिबिरात सहभागी झालो. माझ्या परीने त्या शिबिरांमधून काहीतरी विशेष शिकत राहिलो. आजवर अटेंड केलेल्या महत्वपूर्ण शिबिरांमधील “कायद्याने वागा लोकचळवळीचे ऋतुसंगत हे दोन दिवसीय निवासी शिबीर.”

इतर शिबिरांपेक्षा वेगळी वाट घतलेलं शिबीर. ना या शिबीराची प्रसिद्धी, व्याख्याते म्हणून प्रसिद्ध व्यक्ती नाहीत, ना इथे कोणाला मोठेपणा, नाही शिबिरार्थी संख्या मोठ्या प्रमाणात, तरीही मनाला भावलेलं शिबीर.

मनाला भावण्यामागे कारणही तसंच ! इथं व्याख्याता म्हणून येणारा प्रत्येक व्यक्ती हा याच कायद्याने वागा लोकचळवळीचा धागा. कधी काळी शिबिरार्थी असणारा तो व्यक्ती आज आम्हाला संबोधित करत होता. हाच या चळवळीचा प्लस पॉईंट आहे.

शिबिरांमध्ये घेतलेले विषयही तेवढेच महत्वपूर्ण व विचार करायला लावणारे होते. एक संवेदनशील कार्यकर्ता कसा असावा ? त्याच्याकडून संविधानिक तत्वांचा वापर कशा पद्धतीने केला जावा, इथपासून ते अगदी आरोग्य, शिक्षण, निवडणुका, लिंग भेद, सेक्स, महिला सक्षमीकरण, पत्रकारिता ,परिवहन, निसर्ग, पर्यटन, व्यापार यांची कमतरता ते सुयोग्य नियोजनापर्यंत अभ्यासपूर्ण सुसंवादामुळे नक्कीच शिबिरार्थीच्या ज्ञानात भर पडली व ते सर्व दैनंदिन जीवनात वापरून नक्कीच बदलाच्या प्रक्रियेमध्ये सामील होतील, याच्यात शंकाच नाही.

राज सर व कायद्याने वागा लोकचळवळच्या सर्व सहकाऱ्यांचे सुंदर अशा ऋतूसंगत निवासी शिबिराचे आयोजन केल्याबद्दल धन्यवाद ! कायद्याने वागा लोकचळवळ ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील भारतीय संविधानाला अभिप्रेत अशी सर्वात मोठी लोकचळवळ असणार, याच्यात किंचितही शंका असणार नाही. नव कार्यकर्त्याला आपले विचार सादर करण्यासाठी स्टेज उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद !

 

 

 

 

सिद्धार्थ एकमल्ले

मोहोळ, सोलापूर

siddharthekmalle1@gmail.com / 8888950292

MediaBharatNews

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!