मुंबई महानगरपालिकेची शासनाच्या बांधकाम विभागाला वृक्ष संवर्धन कायद्याखाली कारवाईची तंबी !!!

मुंबई महानगरपालिकेची शासनाच्या बांधकाम विभागाला वृक्ष संवर्धन कायद्याखाली कारवाईची तंबी !!!

मुंबई महानगरपालिकेची शासनाच्या बांधकाम विभागाला वृक्ष संवर्धन कायद्याखाली कारवाईची तंबी !!!

नेहमीची होती आंदोलने ही आता मुंबईतील आझाद मैदानाची ओळख झाली आहे. या आंदोलनांच्या निमित्ताने मैदानावर सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या दिमतीला पोलिसांचा राबता असतो. राज्यभरातले लोक आपले प्रश्न घेऊन लोक आझाद मैदानात ठिय्या मारतात, पण आझाद मैदानातील एखादा विषय आजवर शासनापर्यंत गेला नव्हता. आझाद मैदानातील झाडांभोवतीच्या जमिनीचं काॅंक्रिटीकरण करण्याच्या मुद्द्यावरून मुंबई महानगरपालिकेने राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला चक्क कायदेशीर कारवाईची नोटीस बजावली आहे.

कायद्याने वागा लोकचळवळीचा दक्षिण मुंबई समन्वयक तुषार वारंग आरेसाठीच्या आंदोलनासाठी आझाद मैदानावर आला होता. तिथे त्याचं लक्ष गेलं, मैदानातील झाडांकडे. झाडांना काॅंक्रिटीकरणाचा वेढा पडला होता. भोवताली माती नावाला नव्हती. झाडांवर खिळे ठोकणे, विद्युत रोषणाई करणे, जाहिरात फलक लावणे, धागे गुंडाळणे अशा विषयांबाबतीत मुंबई, नवी मुंबई महापालिकेला तक्रारी करून हैराण करून सोडलेल्या तुषारने लागलीच आझाद मैदानावरील झाडांचा फोटो काढला आणि मुंबई महानगरपालिकेच्या माय बीएससी हॅण्डलवर ट्वीट केला. तेवढ्यावरच न थांबता, आपले सरकारमार्फत ही तुषार ने रीतसर तक्रार नोंदवली.

१५ सप्टेंबरला नोंदवलेल्या तक्रारीवर २० सप्टेंबरला म्हणजे पाचच दिवसांत, तुषारला ट्वीटर आणि आपले सरकारवर मुंबई महानगरपालिकेच्या ए वार्ड कडून उत्तर आलंय. सदरचा परिसर राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रेसिडेन्सी विभागांतर्गत येतो, असं उत्तरात म्हटलंय. पण महानगरपालिका तेवढ्यावर थांबलेली नाही.

महानगरपालिकेच्या उद्यान सहाय्यक अधिक्षकांनी बांधकाम विभागाच्या प्रेसिडेन्सी क्षेत्राच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र नव्हे तर सज्जड नोटीस बजावलीय. झाडांभोवतीचं काॅंक्रीटीकरण मंत्र्यांचा वापर न करता खोडाला, मूळांना इजा होणार नाही अशा पद्धतीने हटवून राष्ट्रीय हरीत लवादाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मातीचा एक मीटरचा परीघ सोडून पूर्ववत बांधकाम करावं, असं महानगरपालिकेने साबांविला बजावलं आहे.

केलेल्या कामाची छायाचित्रेही सात दिवसांत पाठवायला सांगून हयगय केल्यास वृक्ष संवर्धन व संरक्षण कायद्याखाली कारवाईची तंबीसुध्दा महानगरपालिकेने दिली आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!