सावधान ! सार्वजनिक ठिकाणी धूळ खात पडलेले तुमचं वाहन आता जप्त होऊ शकतं !

सावधान ! सार्वजनिक ठिकाणी धूळ खात पडलेले तुमचं वाहन आता जप्त होऊ शकतं !

सावधान ! सार्वजनिक ठिकाणी धूळ खात पडलेले तुमचं वाहन आता जप्त होऊ शकतं !

रहदारीस अडथळा आणि शहराच्या विद्रुपीकरणास कारणीभूत ठरणाऱ्या बेवारस वाहनांविरोधात उल्हासनगर महानगरपालिकेने धडक मोहिम सुरू केलीय. पहिलं पाऊल म्हणून कारवाईचा इशारा देणाऱ्या नोटीसा वाहनांवर चिकटवण्याची मोहिम महापालिकेने सुरू केली आहे. लवकरच अशा वाहनांची जप्ती केली जाणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी ही माहिती मीडिया भारत न्यूज ला दिली. 


उल्हासनगर शहरात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांवर, चौकांमध्ये, मुख्य ठिकाणी बेवारस वाहने पडून आहेत व सदरच्या बेवारस वाहनांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन सोबत शहराचं विद्रुपीकरण देखील होत असल्याची गंभीर दखल आयुक्त अजीज शेख यांनी घेतली होती. सदर वाहनाखालील जागा स्वच्छ करता येत नसल्याच्या घनकचरा विभागाच्या तक्रारीही होत्या.

२ नोव्हेंबर रोजी आयुक्त अजीज शेख यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेत पालिका अधिकारी, पोलीस अधिकारी व शहर वाहतुक शाखा यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत शहरातील रस्त्यांवरील बेवारस वाहनं हटविणेसाठी विशेष मोहिम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्या अनुषंगाने प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांमार्फत विशेष मोहिम आयोजित करुन बेवारस वाहनं शोधून त्यांच्यावर इशारा देणाऱ्या नोटीसा लावण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांची अंमलबजावणी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालीय. उल्हासनगरवासियांनी या मोहिमेचं स्वागत केलं आहे.

कायद्याने वागा लोकचळवळीचे कोकण संघटक दिपक परब यांनी उल्हासनगर महानगरपालिकेच्या कारवाईचं स्वागत करून वाहतुकीसंदर्भात आणखीही उपाययोजना करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

विहित मुदतीत बेवारस वाहन सार्वजनिक जागेवरून हटवलं न गेल्यास महापालिका व पोलीस विभाग संयुक्तरित्या कारवाई करुन सदरचं बेवारस वाहन जप्त करणार असल्याचं जमीर लेंगरेकर यांनी मीडिया भारत न्यूज ला सांगितलं. उल्हासनगरातील वाहतूक कोंडी फोडून शहरवासीयांना मोकळा श्वास घेता येईल अशा आणखीही उपाययोजना पोलिसांसोबतच्या बैठकीत प्रस्तावित करण्यात आल्या असून त्यांना मंजूरी मिळाल्यानंतर अंमलबजावणी करण्यात येईल, अशीही माहिती लेंगरेकर यांनी दिली.

MediaBharatNews

Related Posts

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!