अभिलाष गोजेची सामाजिक उद्योजगता

अभिलाष गोजेची सामाजिक उद्योजगता

अभिलाष गोजेची सामाजिक उद्योजगता

सामाजिक क्षेत्र हे संपूर्णतः मदती वर अवलंबून आहे, अशी समजूत मोडीत काढत महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील एका तरुणाने औरंगाबाद शहरात सामाजिक उद्योजकता या संकल्पनेवर स्वतः चा व्यवसाय उभा करण्याच्या कौतुकास्पद प्रयत्न केला आहे. हा तरूण आहे अभिलाष गोजे.

सहारा बालग्राम परिवारात तो घडला आहे, इथे त्याच समाजभान आकारास येत होतच, पण त्याला केवळ भावनिकतेतून तो पाहत नव्हता. सामाजिक बदल घडून आणायचे असल्यास त्याच्या अनेक बाजू सांभाळाव्या लागतात त्यापैकी एक असते आर्थिक बाजू. त्याचं सुरुवातीपासून एकच मत होत की कायम कुणाच्याही मदतीवर आपल काम अवलंबून असायला नको. यातून त्याने शाश्वत फाऊंडेशन सुरू केली, गरजू, निराधार महिलांना एकत्र करून आधी काही प्रयोग ही केले, त्यात अनेक चढउतार पाहत तो होता,

पुढे बालग्राम परिवारातील, मुंबईतील ऊद्योजिका शुभा बेनुरवार यांनी यात पुढाकार घेत, स्वतः आर्थिक पाठबळ उभे केले आहे. वैष्णवी सावंत आणि त्यांच्या टीम यांच्या सहकार्यातून मासिक खानावळ सुरू करण्याचा निर्णय झाला, गेले काही महिने या टीम च्या मदतीने ही खानावळ सुरू झाली होतीच, या सगळ्यात त्याने जपलेली गोष्ट म्हणजे घरची चव, अनेक परगावाहून आलेलं विद्यार्थी चांगल्या जेवणाला मुकतात हा अनुभव त्यानेही घेतलेला होता, त्यातूनच तो दर्जा टिकवण्याचा प्रयत्न करतोय.

सहारा बालग्राम चे पालक संतोष गर्जे आणि प्रीती गर्जे यांच्या हस्ते या खानावळी चे उद्घाटन झाले.

नेहमी समाजासाठी काही तरी करायचं अस प्रत्येकजण नेहमी म्हणत असतो, अश्या लोकांच्या मागे समाज उभा राहिला तरी खूप होईल. औरंगाबाद मध्ये आपण राहत असाल किंवा कधी गेलात तर अभिलाष ला नक्की भेटा आणि या जेवणा चा आस्वाद घ्या.


राकेश पद्माकर मीना

राज्य संघटक
कायद्याने वागा लोकचळवळ

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!