आमच्याविषयी

कोणताही कायदा तीन मूलभूत कसोट्यास उतरावा लागतो….कायदा निश्चित असावा लागतो. त्याच्या कोणत्याही कलमाबद्दल अगर तरतूदीबद्दल शंका, असंदिग्धता राहता कामा नये. त्याचा अर्थ सुस्पष्ट व स्वच्छ असला पाहिजे. कायदा हा सर्व ठिकाणी सारखा असावा लागतो. प्रादेशिक फेरफारांनी तो जखडलेला असता कामा नये.कायदा हा सर्व जनतेस आश्रय घेता येईल, असा माफक व सुबोध असला पाहिजे. आपले हक्क काय आहेत, हे दरेक नागरिकास समजले पाहिजे. हरघडी त्याने वकीलावरच विसंबले पाहिजे, असा कायदा असू नये. असं मत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ११ जानेवारी १९५० रोजी मुंबईत सिध्दार्थ कॉलेजच्या विद्यार्थी पार्लमेंटसमोर हिंदू कोड बिलावर भाषण करताना मांडलं. विषयांची तळमळ, विषयांचा अभ्यास आणि विषयांची परिणामकारक मांडणी या आंबेडकरी त्रिसूत्रीवर कायद्याने वागा लोकचळवळ उभी आहे. कायद्याने वागा लोकचळवळ एक सकारात्मक भ्रष्टाचारमुक्त सामाजिक एकोप्याची सुसमाजव्यवस्था, लोकाभिमुख राजकीय व्यवस्था निर्माण करण्यासाठी आहे, व्यक्तिगत उणीदुणी काढून समाजव्यवस्था बिघडवण्यासाठी नाही.

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!