आधार कार्ड, मोबाईल क्रमांक व बॅंक खाते एकमेकाशी संलग्न असलेल्यांनाच ऑनलाईन अर्थसहाय !

आधार कार्ड, मोबाईल क्रमांक व बॅंक खाते एकमेकाशी संलग्न असलेल्यांनाच ऑनलाईन अर्थसहाय !

आधार कार्ड, मोबाईल क्रमांक व बॅंक खाते एकमेकाशी संलग्न असलेल्यांनाच ऑनलाईन अर्थसहाय !

सध्याच्या कोविड-१९ साथीच्या परिस्थितीत महाराष्ट्र राज्यातील ऑटो रिक्षा परवानाधारकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी १५०० रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व ऑटोरिक्षा परवाना धारक या अर्थसहाय्यासाठीचे लाभार्थी आहेत. २४ मे पासून रिक्षाचालकांना अर्ज करता येणार आहे.

ऑनलाईन पद्धतीने लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य आहे. तुमचा आधार लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर पाठविलेल्या ओटीपीच्या माध्यमातून अर्जाची पडताळणी केली जाईल. याचा फायदा थेट आधार लिंक बँक खात्यात वर्ग केला जाईल.

कुटुंब सदस्याच्या नावे परवाना हस्तांतरण झालेले असल्यास अर्जदाराने “वारसा/ उत्तराधिकारी” हा पर्याय निवडावा व परवान्याची प्रत अपलोड करावी. सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

आधार कार्ड नसल्यास ते आधी अर्ज करून मिळवावे लागेल. आधार कार्ड बनवताना जो मोबाईल क्रमांक दिलेला होता, तोच सोबत असणं गरजेचं आहे. नसेल तर अर्ज करण्यापूर्वी नवा नंबर आधारशी लिंक करून घ्यावा लागेल. आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकच बॅंकेशी संलग्न हवा. नसेल तर तो आधी बॅंकेत जाऊन संलग्न करून घ्यावा लागेल.

आधार कार्ड नसल्यास किंवा मोबाईल क्रमांक लिंक नसल्यास किंवा बॅंक खात्याशिवायही रिक्षाचालक आरटीओ कार्यालयात थेट संपर्क साधून अर्ज करू शकतात.

अर्थसहाय्याचा अर्ज एखाद्या कारणासाठी नाकारला गेल्यास, कारणाचे निराकरण करून दुरुस्तीसह पुन्हा अर्ज करण्याची सोय आहे. तसंच अर्ज नाकारल्याबाबत समाधान न झाल्यास दाद मागण्याचा मार्गही ठेवण्यात आला आहे.

आपला आधार कार्ड क्रमांक, वाहन क्रमांक, लायसन्स, परमिट, बॅंक खात्याची माहिती तयार ठेवून पुढील लिंक क्लिक करा :
https://transport.maharashtra.gov.in/1133/Autorickshaw-Financial-Assistance-Scheme

या लिंकवर गेल्यावर योजनेच्या माहितीखाली योजनेसाठी अर्ज अशी लिंक आहे, तिथे क्लिक करा :

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!