शाळा सुरू करण्याबाबत काय आहेत शासनाच्या मार्गदर्शक सुचना ?

शाळा सुरू करण्याबाबत काय आहेत शासनाच्या मार्गदर्शक सुचना ?

शाळा सुरू करण्याबाबत काय आहेत शासनाच्या मार्गदर्शक सुचना ?

राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत शिक्कामोर्तब झाल्यानंतर शासनाने शाळा महाविद्यालये, विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामपंचायती, आरोग्यविभाग यांना मार्गदर्शनपर एक परिपत्रक जाहिर केलं आहे. शासन परिपत्रक क्र.संकीर्ण-२०२०/प्र.क्र.८६/एसडी-६ नुसार काय आहेत सुचना-

१) शालेय व्यवस्थापन समितीने घ्यावयाची काळजी

अ) शाळा सुरू करण्यापूर्वी

राज्यातील सर्व शाळा व्यवस्थापन समितीची बैठक विदर्भात २६ जूनला तर उर्वरित महाराष्ट्रात १५ जून रोजी आयोजित करावी. सदर बैठकीत शाळा सुरु करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी, स्वच्छतागृहाची स्वच्छता, विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये म्हणून करावयाचे नियोजन इतर बाबीचे निर्णय घ्यावेत.परिस्थिती नुसार ह्या बैठका सुरक्षित अंतर राखून किंवा व्हाट्स अॕप,VC द्वारे आयोजित करावी.

शाळेत क्वारंटाईन केंद्र किंवा निवारा केंद्र बनवलेले असल्यास ग्रामपंचायत/नगरपालिका/महानगरपालिका/जिल्हाप्रशासनाद्वारे त्याचे निर्जंतुकीकरण करुन घ्यावे. तसंच सदर शाळा ही शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र घ्यावे.

समितीच्या शिफारशीने तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली कन्टेंमेंट झोन मधील शाळा सुरु करण्याचे निर्णय जिल्हाधिकारी तसेच आयुक्त यांनी घ्यावेत.ह्या क्षेत्रात अद्याप शाळा सुरु करण्याबाबत कोणतीही तारीख निश्चित करता येत नाही. अॉनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर करणे बाबत नियोजन करावे.

ब) भविष्यात शाळा प्रत्येक्षात सुरु करताना

विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर राखणे शक्य व्हावे याकरीता शाळा दोन सत्रांमध्ये(शिफ्टमध्ये) सुरू करणे, एक सत्र (शिफ्ट) जास्तीत जास्त ३ तासाचे असावे. किंवा वेगवेगळ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस सोडून (अदलाबदलीने)शाळेत यावे(odd-even days). प्रत्येक सत्राचा कालावधी व
वेळापत्रक ठरवावे. उदा. सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत, दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत इत्यादी किंवा सोमवार, बुधवार शुक्रवार वर्ग १ते २ व मंगळवार, गुरुवार व शनिवार वर्ग ३ व ४ असे वर्ग सुरु करावेत.

एका वर्गात एका बेंचवर एक विद्यार्थी, किंवा १ वर्गात २० ते ३० विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था करावी,बैठक व्यवस्थेत किमाण १ मीटर अंतर ठेवावे.

शाळेच्या इमारतीतील अतिरिक्त खोल्या स्वच्छ करुन घ्याव्यात, हात धुण्याची व्यवस्था करावी, शाळेचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करावे.

शाळा बस, अॕटो मध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही ह्या बाबत काळजी घ्यावी.

शालेय पोषण आहार धान्य घरपोच द्यावेत,जिथे शक्य असेल तिथे शाळेतच आहार द्यायचा का ह्या बाबत निर्णय घ्यावा.

पाठ्यपुस्तक वाटप करण्याबाबतचे नियोजन करावे.

भविष्यात कोविड-१९ चा धोका उद्भवल्यास शिक्षनात खंड पडणार नाही ह्यासाठी अॉनलाईन शिक्षणाचे नियोजन करावे.

जे स्थलांतरीत मजुर गावी गेले आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करावी तसेच त्यांना शालेय साहित्य उपलब्ध करुन द्यावेत.

कोविड संदर्भात विद्यार्थ्यांना वेळोवेळी काळजी घेण्यास सांगावे यात पालकांचाही सहभाग करुन घ्यावा.मास्क वापरणे, हात वेळोवेळी स्वच्छ करणे इ. सुचनांचा समावेश असावा

शाळेत शिक्षक व विद्यार्थी ह्या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश देऊ नये.

२) ग्रामपंचायतीची तसेच स्थानिक प्रशासनांनी घ्यावयाची जबाबदारी

निर्जंतुकीकरण, विज, पाणीपुरवठा, इ.आधुनिक बाबींची जबाबदारी घ्यावी

बाहेरुन येणा-या शिक्षकांची वेद्यकीय चाचणी करुन घ्यावी किंवा त्यांनी केली असेल तर खात्री करुन घेणे.

शिक्षक उपलब्ध नसतील तर स्थानिक स्वयंसेवकांची मदत घ्यावी.

शाळेत साबण,सॕनिटायझर इ.व्यवस्था करावी ह्या साठी ग्रामपंचायतींना मनरेगा निधीही वापरता येईल.

विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी संबधित प्राधिकरणाची मदत घ्यावी.

महानगरपालिका क्षेत्रातील शाळेत wifi उपलब्ध करुन द्यावा. tv cable ची आवश्यकता असल्या पुरवावी.

३) पालकांनी घ्यावयाची जबाबदारी

आपल्या पाल्याला मास्क,पाण्याची बॉटल, बसण्यासाठीची छोटी चटई इ.साहित्या सहीत शाळेत पाठवावे.आपला पाल्य आजारी असेल तर त्याला शाळेत पाठवू नये. मोबाईलचा वापर तुमच्या देखरेखीखाली करु द्यावा. तसेच करोना विषयी जनजागृती आणि घ्यावयाच्या काळजी बाबत वेळोवेळी सुचना द्याव्यात.

४) शिक्षकांची जबाबदारी

करोनामुळे बरेच शिक्षक आपल्या गावी गेले आहेत त्यामुळे अशा शिक्षकांनी प्रशासनाची मदत घेऊन आपल्या कार्यक्षेत्रात परत यावे.

जे शिक्षक करोना कामकाजासाठी कार्यरत आहेत त्यांनी आपले कार्य संपल्यानंतर विलगीकरणाचे सर्व नियम (कार्यमुक्ती आदेश,वैद्यकीय प्रमाणपत्र,ई-पास) पार पाडल्यानंतर प्रशासनाच्या परवानगीने उपस्थित रहावे.

शाळेत अॉनलाईन शिक्षणासाठीचे प्रयत्न करावेत,पालकांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांच्या शंकाच निरसण करुन अध्ययन सुरु ठेवावे.

पाठ्यपुस्तक आल्यानंतर टप्याटप्याने त्याचे वाटप करावे.ज्यांना काही कारणास्तव मिळाले नाहीत त्यांच शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गतवर्षीच्या विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तकं मिळवून द्यावेत

ज्या शाळेत आपली सेवा आहे त्याच गावात आपली रहाण्याची व्यवस्था करावी.

५) आरोग्य विभागाची जबाबदारी

आवश्यकतेनुसार विद्यार्थी तसेच शिक्षकांच्या थर्मल स्कॕनिंगची व्यवस्था करावी.वैद्यकीय तपासणी बाबत नियोजन करावे.

किमान ५ ते कमाल १० शाळांकरिता फिरते आरोग्य तपासणी केंद्र कार्यरत ठेवावेत.

News by Rakesh Padmakar Meena

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!