जखमेवर मीठ चोळत बाधित बेघरांच्या जागेवरच पत्रीपूल लोकार्पण सोहळा ;

जखमेवर मीठ चोळत बाधित बेघरांच्या जागेवरच पत्रीपूल लोकार्पण सोहळा ;

जखमेवर मीठ चोळत बाधित बेघरांच्या जागेवरच पत्रीपूल लोकार्पण सोहळा ;

अनेक अडचणी अडथळे पार करत पत्रीपुलाचे अखेर आज लोकार्पण होणार आहे. गेले चार दिवस पत्रीपुल पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कल्याण डोंबिवली महानगरपालिका व अधिकारी, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ हे दिवस-रात्र युद्धपातळी पेक्षाही जास्त काम करून पत्रीपूल लोकार्पणासाठी तयारी करत आहेत. विकासासाठी सगळी यंत्रणा एकत्र काम करत होती.

परंतु पत्रीपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाचा मंडप ९० फुटी रोडवर उभारण्यात आलाय. सदर मंडप ज्या ठिकाणी उभा आहे, त्याच ठिकाणी ९० फुटी रस्ता रुंदीकरणात मे २०१६ मध्ये बाधित झालेल्या नागरिकांची घरे होती.

सदर नागरिकांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून पुनर्वसनासाठी पात्र असल्याचं पत्र देऊन पुढील दोन महिन्यात तुमचे पुनर्वसन करू, असे सांगून नागरिकांकडून घरे खाली करून घेण्यात आली व सदर नागरिकांना विस्थापित करण्यात आले.

नागरिकांनी शहराच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारचे अडीअडचणी निर्माण न करता स्वतःची घरे खाली केली, पण जमीनमालकाने सदर रस्ता चार वर्षे अडवून ठेवला. नागरिकांना महानगरपालिकेमध्ये फेऱ्या मारून देखील अधिकारीवर्ग फक्त तारखांवर तारखा देत आहे.

आयुक्त बदलले, अधिकारी बदलले ; परंतु नागरिकांना घराच्या बदल्यात कुठल्या प्रकारचे भाडे किंवा घर अजून मिळालेले नाही. अश्या वेळी प्रशासन यंत्रणा युद्धपातळीवर काम करताना दिसत नाही.

आता पत्रीपुलासोबत ९० फुटी रस्ताही सुरू होईल, पण सामान्य नागरिकांवर अन्याय करून त्यांना बेघर करून त्यांच्या राहत्या घराच्या जागेवर असे लोकार्पण सोहळ्याचे मंडप उभारून जखमेवर मीठ चोळणे कितपत योग्य आहे….?

 

 

 

दिपक परब

कल्याण पूर्व समन्वयक, कायद्याने वागा लोकचळवळ

 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!