राष्ट्रवादी, भाजपा करत संजय जांभळे पुन्हा शिवसेनेत ! आमदार महेंद्र दळवींच्या हस्ते शिवबंधन

राष्ट्रवादी, भाजपा करत संजय जांभळे पुन्हा शिवसेनेत ! आमदार महेंद्र दळवींच्या हस्ते शिवबंधन

राष्ट्रवादी, भाजपा करत संजय जांभळे पुन्हा शिवसेनेत ! आमदार महेंद्र दळवींच्या हस्ते शिवबंधन

शिवसेनेतून राष्ट्रवादी, राष्ट्रवादीतून भाजपा आणि भाजपातून पुन्हा शिवसेना असा राजकीय प्रवास करत, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा माजी अर्थ आणि बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते हातावर पुन्हा शिवबंधन बांधलं.

रायगड जिल्हा परिषदेमध्ये 2007 पासून अडीच वर्ष जिल्हा संजय जांभळे परिषदेचे उपाध्यक्ष होते. अर्थ आणि बांधकाम सभापती पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. काही मतभेदांमुळे संजय जांभळे यांनी शिवसेना सोडली होती.

त्यानंतर २०१४ ला जांभळे पेणमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार होते. २०१७ ला त्यांनी भाजपातून जिल्हा परिषद लढवली होती. शिवसेनेमध्ये सामान्य शिवसैनिक म्हणून काम करताना पक्षश्रेष्टी जी जबाबदारी देतील ती यापुढे संभाळणार आहे. व माझी पत्नी हे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून येऊन त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. अडीच वर्षापुर्वी विधानसभा निवडणुकीपुर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.

त्यांच्या प्रवेशामुळे आमदार रवींद्र पाटील यांना पेण विधानसभा मतदार संघातून निवडणूक जिंकणं सोपे गेलं होतं. आता पुन्हा भाजपाला जय श्रीराम करत संजय जांभळे यांनी शिवसेनेचं शिवबंधन हातात बांधून घेतलं आहे.

शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख आमदार महेंद्र दळवी, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, शिवसेना पेण तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे, अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी, रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे यांच्या उपस्थितीत जांभळे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!