वादळ मागे ठेवून गेलं घराघरात अंधार आणि उदास शांतता !

वादळ मागे ठेवून गेलं घराघरात अंधार आणि उदास शांतता !

वादळ मागे ठेवून गेलं घराघरात अंधार आणि उदास शांतता !

कोरोनाची सवय होत होती, तितक्यात निसर्ग वादळाच्या चर्चा, बातम्या कानावर येऊ लागल्या.बातम्या येई पर्यंत जूनची २ तारीख उजाडली. अलिबाग हे केंद्रबिंदू असल्याने जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली होती. अलिबागमध्ये संचारबंदी लागू केली होती. प्रशासनाने योग्य ती काळजी घेतली. नागरिकांनीसुद्धा प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद दिला ; त्यामुळे जीवितहानी झाली नाही.

अलिबाग हे पर्यटन ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.अनेक वेगवेगळे समुद्र किनारे, त्याच्या आजबाजूला असणारी सुरुची बने, नारळाची झाडे व्यक्तीला मोहून टाकतात. फेसाळणारा समुद्र प्रत्येकाला आपलंसं करतो. समुद्रकिनारचा सुर्यास्त वेड लावणारा असतो.

तसं पाहिलं तर कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतरसुद्धा अलिबाग ही सुरक्षित जागा होती. गावातल्या गावात सगळे सुखाने नांदत होते. लॉकडाऊन च्या काळात सगळे व्यवहार बंद असले तरी जीवनावश्यक वस्तूंचे व्यवहार चालू होते. मात्र मे महिन्याच्या लॉकडाऊन मध्ये कोरोना रुग्ण आहेत असे ऐकायला येऊ लागले. लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे जो तो आपापल्या घरी, गावी परत येऊ लागले होते.

२ जून च्या दुपारपासूनच मुसळधार पाऊस,जोरदार वारे वाहू लागले होते. दोन वर्षापूर्वीसुद्धा एक वादळ आले होतं. १५ ते २० मिनिटे होतं. त्यावेळीही खुप नुकसान झाले होते. आताही तसंच असेल असे वाटले. पण तसे झाले नाही. तर त्या पेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण झाली होती.

रात्रभर घोंगवणारे वारे सकाळी सकाळी थोडे शांत झाल्यासारखे वाटायला लागले होते. पण ३ जून च्या सकाळच्या ९/१० वाजता पुन्हा वारा आणि पाऊस यांनी उग्र रूप धारण करायला सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही निसर्गाचा आनंद घेत होतो. वाहणारे वारे, घोंगवणारा आवाज जसजसा चिरकळी फोडू लागला तसं मग मनात भीतीचे सावट निर्माण झाले.

झाडांच्या फांद्या मोडून पडायला लागल्या. लोकांच्या शेडचे पत्रे, घराचे छत तुटण्याचा आवाज येऊ लागला. जोरजोरात खिडक्या वाजू लागल्या. त्यातून पाणी आत येऊ लागले. वीजपुरवठा २ जून पासूनच बंद होता.

३ जूनच्या संध्याकाळी ४/५ च्या दरम्यान वाऱ्याचा जोर कमी व्हायला लागला. पाऊसही कमी झाला.वादळ आले आणि गेले सुद्धा…त्याला कुणालाच रोखता आले नाही. निसर्गापुढे कुणाचेच चालत नाही. वादळ पुढे निघून गेले…जात जात अनेक समस्या ठीक ठिकाणी निर्माण करत गेले. नंतर ते शांतही झाले. पण आता प्रश्न निर्माण झाला वादळानंतरच्या शांततेचा…..

या वादळामुळे अनेक घरात, कुटुंबांमध्ये शांतता पसरली आहे. जवळ जवळ बऱ्याच लोकांच्या घराचे पत्रे उडून गेले आणि पावसात ज्यांचे घराचे छत उडून जाते, त्यांचे हाल किती होतात, याची कल्पना न केललीच बरी….लोकांनी गाठीचा पैसा वाचवून घर बनवलं असते. असं घर उघड्यावर येणं फार कठीण होऊन जातं. गरीब वस्त्यांना फार मोठा हादरा बसला आहे. त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत.

एका आंब्याच्या झाडाला फळ यायला १५/२० वर्ष लागतात. त्या आंब्याच्या बागा उखडून गेल्या आहेत. नारळ, सुपारीची झाडे उन्मळून पडली आहेत. कोकणातील लोक निसर्गावर खूप प्रेम करतात. त्यातल्या त्यात आंबा, नारळ, सुपारी,फणस, चिंचं या सारख्या झाडांवर तर जीवापाड प्रेम करतात. त्यांच्या उत्पन्नाचे पण एक साधन ही झाडं आहेत. हीच झाडे त्यांच्या डोळ्यासमोर तुटली आहेत, पडली आहेत. खूप मोठा मानसिक त्रास झालेला आहे. आर्थिक आणि मानसिक नुकसान झालेले आहे. कष्टकरी शेतकरी हतबल झाला आहे. आता या संकटातून सरकार काय मदत करेल याची वाट पाहतोय.

आताच्या परिस्थितीत अलिबागमध्ये खूप इलेक्ट्रिक पोल पडलेले आहेत. निसर्ग वादळामुळे शेकडो ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झालेला असून पुनर्निर्माणचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. असे असतानासुद्धा पाहिजे त्या प्रमाणात विद्युत पुरवठा सुरळीत करता येऊ शकला नाही.

त्याच बरोबर पाणी पुरवठा पण विस्कळीत झाल्याने नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अत्यावश्यक सेवांचे संबधित कर्मचारी युद्ध पातळीवर काम करूनसुद्धा झालेल्या नुकसानच्या प्रमाणात मनुष्यबळ कमी पडत आहे. अलिबाग मधील काही ठिकाणी वीज आलेली आहे, ती सुद्धा वारंवार जात आहे.अलिबाग तालुक्यातील बरीचशी गावं अजूनही अंधारात आहेत.

सध्या आपण पर्यावरणात होणाऱ्या बदलाला सामोरे जातच आहोत. त्यात आता ही पर्यावरणाची इतकी मोठी हानी झालेली आहे. ही भरून काढण्यासाठी कितीतरी मोठा कालावधी जावा लागेल.

शालिनी आचार्य

मिडिया भारत न्यूज च्या अलिबाग प्रतिनिधी तसंच कायद्याने वागा लोकचळवळीच्या अलिबाग तालुका समन्वयक

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!