कुठे पाहाल दहावीचा निकाल ! कशी होईल गुणपडताळणी ?

कुठे पाहाल दहावीचा निकाल ! कशी होईल गुणपडताळणी ?

कुठे पाहाल दहावीचा निकाल ! कशी होईल गुणपडताळणी ?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे १० वीचा निकाल आज बुधवार दि. २९ जुलै रोजी दु. १ वा. महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने जाहिर होणार असल्याचे महामंडळाने आपल्या परिपत्रकाद्वारे कळवले आहे.

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल बघता येणार आहे.

मार्च २०२० मध्ये परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण ऑनलाईन पध्दतीने कळणार असल्याचे पत्रकात नमूद केले आहे. निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी, उत्तर पत्रिकांच्या छायाप्रत, पूनर्मुल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्जदाराला स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून करण्यात आल्याचं महामंडळाने सांगितलं आहे.

गुणपडताळणीसाठी ८ आॅगस्ट पर्यंतची मुदत आहे तर छायाप्रतीसाठी १८ आॅगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. पुनर्मुल्यांकनासाठी आधी छायांकित प्रती घेणं आवश्यक आहे. त्या मिळाल्यावर ५ दिवसांत अर्ज करता येणार आहेत.

verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार असल्याचे महामंडळाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हंटले आहे .श्रेणीसुधारसाठी दोनच संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.

विभागीय मंडळांचे पत्ते व संपर्क पुढीलप्रमाणे :

१. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागीय मंडळ , शिवाजीनगर ,पुणे – ४११००५

संपर्क : ०२०-२५५३६७८१, २५५३६७८२

२. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर विभागीय मंडळ , सिव्हिल लाईन्स नागपूर – ४४०००१

संपर्क : ०७१२-२५५३४०१, २५५३४०३

३. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ औरंगाबाद विभागीय मंडळ , रेल्वे स्टेशन रोड , उस्मानपुरा औरंगाबाद – ४३१००५

संपर्क : ०२४०-२३३४२२८,२३३२८८४

४. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागीय मंडळ ,फ्लॅट नं.२७ व २८ , सेक्टर १६- जे , वाशी नवी मुंबई – ४००७०३

संपर्क : ०२२-२७८८१०७५ , २७८८१०७७

५. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय मंडळ ,५३९ कसबा करवीर , शिवाजी विद्यापीठाचे पाठीमागे, राजेंद्रनगर , कोल्हापूर – ४१६००४

संपर्क : ०२३१-२६९६१०१, २६९६१०२

६. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ , अमरावती विभागीय मंडळ ,शास्त्रीनगर कॅम्प ,अमरावती ४४४६०२

संपर्क : ०७२१-२६६२६४७, २६६२६७८

७. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ , नाशिक विभागीयमंडळ ,शास्त्रीनगर कॅम्प , नाशिक -४२२००३

संपर्क : ०२५३-२५९२१४२,२५९२१४१

८. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ,लातूर विभागीय मंडळ , सुतमिल एरिया राजस्थान मारवाडी हायस्कूलच्या मागे लातूर – ४१३५३१

संपर्क : ०२३८२-२५८२४१

९. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ,कोंकण विभागीय मंडळ ,एम.आय.डी.सी. मिरजोळे, जि रत्नागिरी – ४१५६१२

संपर्क : ०२३५२-२२८४८०

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!