सगळ्यांनाच रस्ते हेमामालिनींच्या गालासारखे हवेत ! मग भारतीय रस्ते परिषदेच्या मापदंडांचं काय करायचं?

सगळ्यांनाच रस्ते हेमामालिनींच्या गालासारखे हवेत ! मग भारतीय रस्ते परिषदेच्या मापदंडांचं काय करायचं?

सगळ्यांनाच रस्ते हेमामालिनींच्या गालासारखे हवेत ! मग भारतीय रस्ते परिषदेच्या मापदंडांचं काय करायचं?

ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांनी रस्त्यांची तुलना प्रसिद्ध अभिनेत्री व खासदार हेमामालिनी यांच्या गालांशी केली आहे. यावरून भाजपाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य चित्रा वाघ संतापल्या आहेत. ट्वीट करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना कुलस्ते यांच्या विधानाची दखल घेऊन कारवाई करण्याची विनंती केली आहे ; तसंच केंद्रीय महिला आयोगानेही या वक्तव्याची नोंद घ्यावी असंही ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

गेल्यावर्षी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनीही आपल्या मतदारसंघातील रस्त्यांची तुलना हेमामालिनी यांच्याच गालांशी केली होती. त्यावेळीही मोठं वादळ उठलं होतं.

एखाद्या जबाबदार नेत्यांने स्त्रीअंगांचा तुलनेसाठी वापर करावा का, हा विषय तेव्हा छेडला गेला होता. स्वतः हेमामालिनी यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना, मला माझ्या गालांची काळजी घ्यायला हवी, असं मिश्किलपणे म्हटलं होतं.

त्याच सोबत त्यांनी अशा प्रकारच्या वक्तव्यावर खंतही केली होती. जबाबदार पदांवरील व्यक्तींनी अशी तुलना टाळायला हवी, अशी प्रतिक्रिया हेमामालिनी यांनी दिली होती.

हेमामालिनी यांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यांची तुलना ज्यांच्या गालांशी करण्याची सुरुवात राजद नेते लालूप्रसाद यादव यांनी केली होती व त्यानंतर इतरांनी तीच री ओढत सुरुवात केली.

मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारातील मंत्री पी सी शर्मा यांनाही २०१९ मध्ये रस्त्यांबाबत वक्तव्य करताना तुलनेसाठी हेमामालिनी यांची आठवण झाली होती, तर त्यांच्या पाठोपाठ छत्तीसगडमधील वाणीज्य कर मंत्री कावसी लखमा यांनीही, मी नक्षलग्रस्त भागातून येतो, पण माझ्या क्षेत्रात मी हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते बनवलेत, असं वक्तव्य केलं होतं. आता फग्गन सिंग कुलस्ते यांच्या वक्तव्याच्या निमित्ताने हा विषय पुन्हा चर्चेत आलाय.

राजकीय नेते मुद्दाम हेमा मालिनी यांचा अनादर करताहेत, असं सामाजिक कार्यकर्ता संयोगिता ढमढेरे यांना वाटत नाही. त्या म्हणतात, जे ब्रान्ड आहे, त्याचा वापर करणं ही पुरुषी मानसिकता आहे. मग ते जाहिरात क्षेत्र असो, मार्केटिंग असो की राजकारण ! अगदी वैचारिक बोलणाऱ्या पुरुषांच्या खाजगी चर्चातही त्यांच्यातला पुरुष डोकावतो. आज पंच्याहत्तरीत आल्यानंतरही हेमामालिनी जाहिरातींतून दिसताहेत, याचा अर्थ त्यांची जादू जनमानसावर आहे. फक्त जाहिरातीत त्यांना माॅडेल म्हणून पैसे मिळतात आणि इथे नेते त्यांच्या प्रतिमेचा मोफत वापर करताहेत.

वास्तविक, आपल्याकडे भारतीय रस्ते परिषदेने रस्त्यांचा दर्जा व त्याचे मापदंड ठरवलेले आहेत, परंतु क्वचितच तसे दर्जेदार रस्ते बनवले जातात. अशावेळी त्या ठोस निकषांतून बाहेर काढून लोकांना भुलवण्यासाठी ढोबळ प्रतिकांचा वापर केला जातोय.

लालू प्रसाद यांच्या विधानानंतर जवळजवळ दहाबारा वर्षे उलटलीत, पण वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांना रस्त्यांबद्दल बोलताना हेमा मालिनीचेच गाल आठवताहेत. वयाची ७३ वर्षे गाठलीत. पंच्याहत्तरीच्या दिशेने प्रवास सुरू आहे, पण आजही रस्त्यांच्या दर्जासाठी हेमामालिनींचे गाल हा जणू मापदंड झालाय. मग भारतीय रस्ते परिषदेच्या मापदंडांचं काय करायचं?

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!