टोकावरचा दुर्लक्षित आवाज पोहचवण्यासाठी बहुजन महिला संवादाचं माध्यम !

टोकावरचा दुर्लक्षित आवाज पोहचवण्यासाठी बहुजन महिला संवादाचं माध्यम !

टोकावरचा दुर्लक्षित आवाज पोहचवण्यासाठी बहुजन महिला संवादाचं माध्यम !

गेल्या वर्षापासून कोरोनाचा सामना आपण करतोय. या वर्षभरात सोशल मीडियावर अनेक उपक्रम राबवले गेले. कला, साहित्य, वैचारिक मतप्रदर्शन, प्रबोधन यासाठी अनेकांनी आपला सहभाग समाज माध्यमांतून नोंदवला. याच पार्श्वभूमीवर ‘बहुजन संवाद’ या युट्युबवरील संवाद मालिकेने सुरुवात केली आणि बघता बघता 393 पर्यंतची विविध विषयांवरील सत्र यशस्वीरित्या पूर्ण केली.

जात पंचायत या विषयावर आधारित बहुजन महिला संवादची सत्रं असून साप्ताहिकी व्यक्तित्वात भंवरीबाई यांची मुलाखत असणार आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लता प्रतिभा मधुकर यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने सुरू झालेल्या बहुजन महिला संवादचे पहिले सत्र नुकतेच पार पडले. बहुजन महिला संवादच्या तीन दिवसीय सत्रांत स्त्रियांच्या विविध प्रश्नांना राष्ट्रीय पातळीवर आवाज मिळवून देणार असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लता प्रम यांनी मिडिया भारत न्यूज च्या कार्यकारी संपादक वृषाली विनायक यांच्याशी बोलताना सांगितलं.

T.R. Athya, Jabar Singh Verma आणि Dr. Sunilam यांनी सुरू केलेल्या बहुजन संवादचं पुढचं पाऊल म्हणजे ‘बहुजन महिला संवाद’.

बहुजन संवादच्या जवळपास 350 एपिसोडसमध्ये लता प्र.म. यांनी अथकपणे काम केले आहे. दिवसाचे सहा-सात तास या कामी त्या खर्च करत आहेत.

सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, सगुणा क्षीरसागर, मुक्ता साळवे, डॉ. रखुमाबाई, रमाबाई आंबेडकर, राणी गुडिया या सर्वांना स्मरण करून हा कार्यक्रम करतोय, असं लता प्र.म. सांगतात.

बहुजन महिला संवादच्या गुरुवार, शुक्रवार, शनिवार या तीन दिवसीय सत्रांत स्त्री प्रश्नांना राष्ट्रीय पातळीवर आवाज मिळवून देणार असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या डॉ. लता प्रम यांनी सांगितलं.

बहुजन महिला संवादचे स्वरूप सांगताना त्या म्हणाल्या,

“जो समाज अत्यंत टोकावर आहे, ज्यांचा आवाज यायलाच पाहिजे त्याला बहुजन महिला संवाद मध्ये महत्त्व आहे. काश्मीर ते नागालँड, ओरिसा, गुजरात, झारखंड या भागातल्या महिलाही बहुजन महिला संवादशी जोडलेल्या आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रातील ठळकपणे काम करणाऱ्या दोन-तीन मुस्लिम स्त्रिया आपल्याला माहीत असतात, परंतु माझ्या आजवरच्या देशभरातल्या वावरात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या ७५ पेक्षा अधिक मुस्लिम स्त्रिया संपर्कात आहेत. ज्यांना स्वतः चा आवाज आहे. उदाहरणच सांगायचं तर काश्मीरची आलिया, दिल्लीची तरन्नुम, मेहरूना जिने आसाममध्ये पूर्णपणे हिंदू मुस्लिम अजेंड्यावर सांप्रदायिकता सद्भावनावर निवडणूक लढवण्याचे प्रयत्न केले, असे वेगवेगळ्या ठिकाणचे स्वर महिला संवादशी जोडले जात आहेत. “

पुढे त्या असंही म्हणाल्या,

सेक्सवर्कर्सचे प्रश्न अनेक चॅनेलवर घेतले जात नाहीत. बहुजन संवाद ने पहिल्यांदा ट्रांसजेंडरच्या अधिकाराचा प्रश्न चॅनलवर आणला. सेक्सवर्कर्सचे प्रश्न आणि प्रत्यक्षात सेक्सवर्कर्स यांना बहुजन महिला संवादमध्ये आणण्याचा विचार आहे..

लता प्र.म. सांगतात की,

कोरोनाच्या परिस्थितीत अशा पद्धतीने ही चळवळ जिवंत ठेवणं विशेषतः धर्मांधते विरोधी सगळी लाट असतानाही चळवळ सुरू ठेवणं हे योगदान मला महत्त्वाचं वाटतं. हा बौद्धिक खुराक मिळाला नाही, हे स्वर जर आले नाहीत तर हा इतिहास लपून जाईल आणि हा इतिहास माझ्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी दिला पाहिजे, असं मला वाटतं.

माझ्यातल्या कार्यकर्त्याची आणि संशोधकाची तळमळ ही, की मी जो अभ्यास केलाय तो तळागाळातल्या लोकांसाठी केलाय. तो तिथं पोहोचणं आवश्यक आहे. या देशातल्या ५२ टक्के लोकांचा चेहराच माहीत नाही. केवळ असंघटित म्हणून हे लोक माहीत आहेत. त्यांचा चेहरा आणायचा म्हणजे बहुजनांचा चेहरा आणावा लागेल. आदिवासी, अल्पसंख्यांक, भटके-विमुक्त या सगळ्यांना एकत्र आणण्याचा या माध्यमातून हा एक प्रयत्न आहे. असं त्यांचं म्हणणं आहे.

 

 

 

वृषाली विनायक

कार्यकारी संपादक, मिडिया भारत न्यूज


बहुजन संवाद युट्यूब चॅनलवर जाण्यासाठी इथे क्लिक करा :

https://youtu.be/HeX8Bnhpmro

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!