बॅन्डबेन्जोशिवाय गणराया येतीलही ; पण कलावंतांच्या पोटाचं काय ?

बॅन्डबेन्जोशिवाय गणराया येतीलही ; पण कलावंतांच्या पोटाचं काय ?

बॅन्डबेन्जोशिवाय गणराया येतीलही ; पण कलावंतांच्या पोटाचं काय ?

मागील सहा महिन्यात संस्थांनी पुरवलेल्या जेवणावर, अक्षरशः कसेतरी दिवस काढत आम्ही कुटुंबं पोसली. गणेशोत्सव, नवरात्रीत आम्हाला बँड वाजवून दोन हक्काचे पैसे मिळतील असं वाटलेलं. तीही आशा मावळली. प्रशासनाने गरीबांच्या बँडपथकांवर अन्याय करु नये, बंदी उठवावी, अशी मागणी उल्हासनगरातील बॅन्डपथकवाल्यांनी केलीय.‌

संकट कोणतंही कसलंही असो, भारतीयांचा सण साजरा करण्याचा उत्साह काही कमी होत नाही. सध्या देशात कोरोनाचा फैलावाचे संभाव्य धोके लक्षात घेऊन महानगरपालिकांनी सण-उत्सवांवर काही निर्बंध घातले आहेत. उल्हासनगर महानगरपालिकेनेही गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी याबाबतचं प्रसिद्धीपत्रक प्रसारित केलं आहे.

गणेश भाविकांनी आपल्या आणि कुटुंबाच्या आरोग्य दक्षतेसाठी संसर्ग व संपर्क टाळण्यासाठी यंदाचा गणेशोत्सव साध्या प्रतिकात्मक तसंच पर्यावरणीय पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन मनपा प्रशासनाने केलं आहे. गणेश विसर्जन नदी, ओढे, तलावात न करता कृत्रिम तलावात करावं किंवा मनपाने बनविलेल्या संकलन केंद्रांचा वापर करावा, असेही महापालिकेचे निर्देश आहेत. सोबतच, गणेश आगमण विसर्जन मिरवणूक, बँड, बँन्जोपथकांना बंदी घालण्यात आली आहे.

कोरोनाकाळात प्रशासनाने सण उत्सव, कार्यक्रम, इव्हेंट बंद केलेत. मागील सहा महिन्यात संस्थांनी पुरवलेल्या जेवणावर, अक्षरशः कसेतरी आम्ही दिवस ढकलले. गणेशोत्सव, नवरात्रीच्या दिवसांत आम्हाला दोन पैशांची आशा होती. तीही मावळली.

उल्हासनगरातील बॅन्डपथकवाले प्रामुख्याने पूर्वेकडे पवई परिसरातील सरस्वती नगरमध्ये राहतात. पदपथावरच त्यांचे संसार थाटलेले दिसतात. त्यातल्याच एखाद्या खोपटात बॅन्डचं सामान असतं. सद्यस्थितीत ते पडून आहे. कलावंत हतबल झालेत. परिस्थिती कधी निवळेल याची शाश्वती नाही.

निदान उत्सवात थोडंफार कमावण्याची संधी आहे. तिच्यावर महापालिकेने पाणी फिरवू नये, अशी त्या कलावंतांची मागणी आहे.‌ आम्ही सुरक्षित अंतर पाळू, मास्क वापरू, सँनिटायझर वापरू ; सगळी खबरदारी घेऊन आमची सेवा देऊ; पण बँड, बँन्जोपथकांवरील बंदी हटवावी, अशी मागणी या पथकांच्या वतीने सचिन तायडे या कलावंताने केली आहे.


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!