द्रौपदी पुन्हा डावावर लावली गेली…

द्रौपदी पुन्हा डावावर लावली गेली…

द्रौपदी पुन्हा डावावर लावली गेली…

महाभारतात चक्क धर्मानेच द्रौपदीला जुगारावर लावले होते. त्यामुळेच कदाचित पत्नीवर मालकी गाजवणे हाच पुरूषी धर्म ठरला असावा. उत्तरप्रदेशात धर्माचा मोठा प्रभाव आहे. इतका की एका महाभागाने आताच्या आधुनिक युगात पत्नीला मित्रांसोबतच्या जुगारावर लावले. हा सडेल पुरूषी धर्म इथेच थांबत नाही, तर धर्म इथेही हारतो. इथे कोणीही कृष्ण धावून येत नाही आणि त्या असहाय्य द्रौपदीवर सामुहिक बलात्कार होतो. युपी रामराज्यातले पोलिस इथेही आपल्या धर्माला जागतात. ते गुन्हा दाखल करायला चालढकल करतात आणि पीडितेला न्यायालयात दाद मागून गुन्हा दाखल करण्याचा आदेश मिळवावा लागतो.

उन्नाव बलात्कार प्रकरणातही युपी रामराज्यातील पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात कुचराई केली होती. पोलिसांवरही धर्माचा पगडा आहे. अग्निपरिक्षेची जबाबदारी सीतेची आहे, हे त्यांच्या मनावर बिंबलेलं आहे. आपल्याकडचा महिलांवर थोपवलेला सामाजिक आदर्श गपगुमान अन्याय सहन करणारी सीता आहे, आवाज उडवणारी द्रौपदी नाही !!!

युपीतील जौनपुर जिल्ह्यातील आधुनिक द्रौपदीचा पती दारूड्या आहे. त्याला जुगाराचाही नाद आहे. त्याचा मित्र अरूण आणि एक नातेवाईक अनिल नियमित घरी येत असत. तिघेही दारू पीत, जुगार खेळत. एक दिवस या आधुनिक धर्माने चक्क पत्नीला जुगारावर लावले. मित्रांना पण महाभारत माहित असावं. धर्मच जुगारावर लावतोय म्हटल्यावर कायद्याचा धाक कुठून असणार? पतीच्या निर्णयाविरोधात एक भारतीय संस्कृतीची नारी तक्रार तरी कशी करणार? आणि केली तर तक्रार घेणार कोण?

जुगारात जिंकलेल्या द्रौपदीवर सामुहिक बलात्कार झाला आणि ती धक्कादायक अवस्थेत आपल्या एका काकांकडे आली. पण धर्माने येऊन तिला हात जोडले, माफी मागितली, परत येण्याच्या विनवण्या केल्या. पती हाच परमेश्वर या संस्कारात ती वाढली होती. पुन्हा पतीसोबत निघाली. धर्माने मग नरो वा कुंजरोवा करीत शब्द फिरवला आणि कार मित्रांकडे नेली. तिथे दुसऱ्यांदा बलात्कार झाला. ती पोलिसांकडे गेली. युपीत पुरूषप्रधान सत्ता आहे. पोलिसांनी तिला हाकलले. तिने मग न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाने सदर प्रकरणात गुन्हा दाखल करायचा आदेश दिला, त्यानंतर युपी सरकारचा पोलिस विभाग हालला.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!