भारतीय संविधानात संतांच्या विचारमूल्यांचाच जागर ; ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ या पुस्तकाचं प्रकाशन

भारतीय संविधानात संतांच्या विचारमूल्यांचाच जागर ; ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ या पुस्तकाचं प्रकाशन

भारतीय संविधानात संतांच्या विचारमूल्यांचाच जागर ; ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ या पुस्तकाचं प्रकाशन

भारतीय संविधानात संतांच्या विचारमूल्यांचाच जागर ; ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ या पुस्तकाचं प्रकाशनज्येष्ठ पत्रकार व प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर यांनी लिहिलेल्या व एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनने* प्रकाशित केलेल्या ‘भेदाभेद भ्रम अमंगळ : संत विचार आणि संविधानिक मूल्ये’ या पुस्तकाचं प्रकाशन खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते सोमवारी पुणे येथे झालं. या पुस्तकाला सुभाष वारे यांची प्रस्तावना लाभलेली आहे.

भारतीय संविधानाने आनंदी समाजासाठी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्याय ही मूल्ये दिली. खरं तर ही मूलभूत मानवी मूल्ये आहेत. संतांनी याच उदारमतवादी विचारांचा पुरस्कार केलेला आहे. समाजातील जात, धर्म, पंथ, वंश, लिंग यावरून कुणालाही कमी लेखू नये. सर्वांना समनतेची वागणूक मिळावी या विचारांचा जागर संतांनी केला. त्याच मूल्यांचा संविधानामध्ये समावेश झाला, याची साध्या सोप्या भाषेत मांडणी शामसुंदर महाराज यांनी या पुस्तकात केली आहे.

संविधान सहज सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे या संविधान संवर्धन समितीच्या वतीने प्रयत्न करीत आहेत. म्हणून त्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात औचित्य होतं, असं एस एम जोशी फाऊंडेशनने म्हटलंय.

यावेळी श्यामसुंदर महाराज सोन्नर, एस. एम. जोशी फाऊंडेशनचे विश्वस्त सचिव सुभाष वारे व फाऊंडेशनचे कार्यकर्ते राहूल भोसले, अमित धुमाळ, किरण पाटील आणि संतोष केंगले तसंच संविधान प्रचारक प्रविण जठार उपस्थित होते.

पुस्तकासाठी संपर्क :
राहूल भोसले : 9822962850
पुस्तकाची किंमत : ५० /- ₹

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!