भुजबळ म्हणतात, क्रेडाईचं कोविड केंद्र आदर्श नमुना !

भुजबळ म्हणतात, क्रेडाईचं कोविड केंद्र आदर्श नमुना !

भुजबळ म्हणतात, क्रेडाईचं कोविड केंद्र आदर्श नमुना !

क्रेडाईच्या माध्यमातून नाशिकमधील ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटरची निर्मिती केली आहे. क्रेडाईने तयार केलेलं हे कोविड केअर सेंटर कोरोनाच्या आरोग्य सेवेचं एक आदर्श मॉडेल असल्याचं प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे.

क्रेडाई आणि नाशिक महापालिकेच्या माध्यमातून ठक्कर डोम येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचं उद्घाटन काल पार पडलं. त्यावेळी ते पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. ते म्हणाले की, कोविडची वाढती संख्या बघता मुंबई पुण्यासोबत नाशिक शहरात अतिरिक्त बेडची व्यवस्था असावी यासाठी क्रेडाईच्या माध्यमातून ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटरची व्यवस्था केली आहे.

कोविड केअर सेंटर बनविण्यासाठी चित्रकार तसेच परिश्रम घेतलेल्या सर्वांचं कार्य कौतुकास्पद आहे. रिक्रिएशन कक्षाच्या माध्यमातून विविध खेळ, पुस्तके , टीव्ही यासह मनोरंजनाची तसेच रुग्णांना योगा, मेडिटेशनसाठी व्यवस्था करण्यात आल्याने अतिशय उत्तम स्वरूपाचं कोविड केअर सेंटर निर्माण झालं आहे. हॉस्पिटलमधील बेड्स संपतील तेव्हा या कोविड केअर सेंटरचा वापर करण्यात येईल.

महापौर सतीश कुलकर्णी म्हणाले, शहराच्या हिताच्या दृष्टीने क्रेडाईने कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून घेतलेलं हे पाऊल अतिशय महत्त्वाचे आहे. तर, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले, नाशिकच्या स्लम भागात रुग्णांची संख्या कमी झाली असून कंपनीच्या परिसरात तसेच सोसायटी परिसरात रुग्ण आढळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात १२०० पथकं काम करत आहे.

क्रेडाई चे अध्यक्ष रवी महाजन म्हणाले , कोविडची महामारी जेव्हापासून ओढवली गेली तेव्हापासून आम्ही मदतीचा हात पुढे केला होता. कोविडच्या संदर्भात उपाययोजना करण्यासंदर्भात आवश्यक ती मदत करण्यास क्रेडाईने वेळोवेळी पुढाकार घेतला आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी क्रेडाईला कोविड केअर सेंटर उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार सामाजिक भान ठेवून ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील अत्यंत सोयीसुविधा उपलब्ध असलेला हे सेंटर आहे. यात ३५० बेडची व्यवस्था करण्यात आली असून ५ ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत; तसंच टीव्ही, चेस, कॅरम, सेल्फी पॉईंट यासह मनोरंजनाच्या अनेक सोयी सुविधा उपलब्ध केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!