भाजपच्या माधवं मध्ये नवा गोपी ! शरद पवारांना केलं पुन्हा लक्ष्य !

भाजपच्या माधवं मध्ये नवा गोपी ! शरद पवारांना केलं पुन्हा लक्ष्य !

भाजपच्या माधवं मध्ये नवा गोपी ! शरद पवारांना केलं पुन्हा लक्ष्य !

शरद पवारांकडे ना कुठलं व्हिजन आहे, ना विचारधारा, ना भूमिका ! राज्यातल्या बहुजनांना आपलं करायचं, त्यांनाच आपसांत भिडवायचं आणि अत्याचारही करायचे, हे शरद पवारांचं राजकारण आहे. असा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे.

शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत अनुकूल असतील असं वाटत नाही ! मागच्या सरकारने घोषित केलेलं आर्थिक पॅकेज या सरकारच्या बजेटमध्ये आलं नाही, अशी माहिती देत, धनगर समाज महाराष्ट्रात लोकसंख्येने दोन क्रमांकाचा समाज आहे. त्याची जर ही अवस्था असेल तर इतर जे छोटे छोटे समाज आहेत, ज्यांचं सरकारात किंवा विधीमंडळात प्रतिनिधित्व नाही, त्यांची अवस्था यांनी गेल्या साठसत्तर वर्षांत काय करून ठेवली असेल ? असा सवाल पडळकर यांनी केलाय.

गावगाड्यातल्या लहान मुलांनाही शरद पवारांची भूमिका कळलेली आहे, असा टोलाही पडळकर यांनी हाणलाय.

पवारांवर हल्ला चढवणारा #माधवं मधला दुसरा गोपी म्हणून पडळकरांकडे पाहिलं जात आहे. यापूर्वी गोपीनाथ मुंडेंनी पवारांवर सातत्याने घणाघाती आरोप केले होते. दाऊदशी संबंध असण्यापर्यंत मुंडेंनी हल्ला चढवला होता. गरज संपताच कालांतराने भाजपांतर्गत मुंडेंचे पंख कापले गेले होते.

पडळकरांसारखा दुय्यम फळीतील नेता भाजपातून फूस असल्याशिवाय पवारांविरोधात विधानं करणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी जरी पडळकरांना समज दिलेली असली तरी राष्ट्रवादीला अस्वस्थ करण्यात भाजपा सफल झाली आहे. शरद पोंक्षेंच्या पक्षीय मंचावर येण्यावरून लक्ष्य झालेला राष्ट्रवादी पक्ष आज पडळकरांच्या आक्षेपार्ह वैयक्तिक टीपणीमुळे बेजार झाला.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!