भाजपाच्या महाराष्ट्र बचाओ आंदोलनात महाराष्ट्रच सोबत नव्हता !

भाजपाच्या महाराष्ट्र बचाओ आंदोलनात महाराष्ट्रच सोबत नव्हता !

भाजपाच्या महाराष्ट्र बचाओ आंदोलनात महाराष्ट्रच सोबत नव्हता !

कोरोना महामारी मध्ये महाराष्ट्र शासन संपूर्ण अपयशी ठरले असून, महाराष्ट्र राज्याला सरकार पासून वाचवण्यासाठी आज महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्र बचाव आंदोलनाची हाक देण्यात आली होती. परंतु या आंदोलनाचा फज्जा उडाल्याचे चित्र महाराष्ट्रभर आहे.

सत्तेच्या हव्यासापोटी भाजपाने लहान लहान मुलांनाही उन्हात उभं केलं. कोरोनाविरोधाऐवजी भाजपाला राजकारण प्रिय आहे. भाजपाने राजकारणाचा सर्वाधिक खालचा स्तर गाठलाय. सर्व मतभेद विसरून जग एकत्रितपणे एका आंतरराष्ट्रीय संकटाचा मुकाबला करत असताना भाजपा लोकांमध्ये भीती, विखार आणि भेदभाव पसरवण्यात गुंग आहे.

आदित्य ठाकरे, शिवसेना नेता

मोजके नेते, पदाधिकारी सोडल्यास खुद्द भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा याकडे पाठ फिरवली असे दिसून आले. समाज माध्यमातून सुद्धा या आंदोलनाची खिल्ली उडविली गेली.

सर्वाधिक रूग्ण, सर्वाधिक मृत्यू! आरोग्य व्यवस्था पूर्णत: कोलमडलेली, शासनाची निष्क्रियता! राज्य सरकारसोबत सातत्याने सहकार्याची भूमिका घेतली. मात्र जनता सहन तरी किती करणार? आज मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात #MaharashtraBachao आंदोलनात सहभाग घेतला, केवळ रूग्णवाहिका नाही, म्हणून अनेकांचे मृत्यू होत आहेत. भाजपाचे हे आंदोलन सरकारला जागे करण्यासाठी आहे. रूग्णसंख्या 40 हजारावर गेली असताना आरोग्यसेवेकडे अजूनही सरकारने गांभीर्याने पाहिले नाही, तर पुढचे परिणाम अतिशय गंभीर असतील, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे.‌

ट्विटर या प्रमुख समाज माध्यमात #महाराष्ट्रद्रोहीBJP हा ट्रेंड १,२०,००० हुन जास्त वेळा चालवला गेला, त्याला उत्तर म्हणून भाजप कार्यकर्त्यांना इतर राज्यातून पाठींबा मिळवण्याची नामुष्की ओढवली.

‘महाराष्ट्र बचाव’ म्हणणाऱ्या सत्ता पिपासूंनो एकदा स्वतःच्या मनाला विचारा…महाराष्ट्रासाठी अहोरात्र झटणारे पोलीस, डॉक्टर, कर्मचारी आणि आरोग्य सेवकांचा आपण अपमान तर करत नाही ना? हेच का तुमचं ‘पार्टी विथ डिफरन्स’.

अनिल देशमुख, गृहमंत्री

महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्ते यांच्याकडून या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यात आले. भाजपच्या काळया रंगांच्या निषेधाच्या आंदोलनाला उत्तर म्हणून महाविकास आघाडी तर्फे भगवा झेंडा फडकवत उत्तर दिले गेले.

चंद्रकांत दादांचे आंगण नेमके कोणते? देवेंद्र फडणवीस तरी आपल्या अंगणात नागपूरला गेले का? त्यांच्या अंगणात काँग्रेस कार्यकर्तेच मदतकार्य करत आहे. कायम राज्यपालांच्या आंगणात जाण्यापेक्षा भाजप नेत्यांनी स्वतःच्या अंगणात जाऊन जनतेला मदत करावी!

बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

राज्यातील ५७२ पक्षीय मंडळातील ६५५६५ बुथवर आंदोलन झाले. १६०१६ गावे सहभागी झाली. पक्षाचे अडीच लाख कार्यकर्ते, त्यांचे कुटुंबीय, नागरिक मिळून ८ लाख ७५ हजार ४८७ नागरिकांचा महाराष्ट्र बचाओ आंदोलनात सहभाग होता, अशी माहिती महाराष्ट्र भाजपाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्रात १ कोटी ४१ लाख ९९ हजार ३७५ मते प्राप्त झाली होती. याचा अर्थ, भाजपाच्या मतदारांपैकी ६ टक्के नागरिकांनी महाराष्ट्र बचाओ आंदोलनात सहभाग नोंदवला.

विशेष म्हणजे केवळ महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनीच नव्हे, तर बड्या नेत्यांनीही #महाराष्ट्रद्रोहीBJP हा हॅशटॅग चालवला.‌ एकंदरीत महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला आपले आंदोलनाच्या गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढवली.

News by Rakesh Padmakar Meena


 

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!