भाजपाईंना सुखावतंय शेख हसीना यांच्या पदरावरचं कमळ !!!

भाजपाईंना सुखावतंय शेख हसीना यांच्या पदरावरचं कमळ !!!

भाजपाईंना सुखावतंय शेख हसीना यांच्या पदरावरचं कमळ !!!

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा बांगलादेश दौरा विवादित ठरला. मोदींनी बांगलादेशातून पश्चिम बंगाल निवडणुकीचा प्रचार केला, असा आरोप होतोय. पण आता आणखी एका मुद्द्यावरून मोदींचा दौरा चर्चेत आलाय. तो म्हणजे या दौऱ्यादरम्यान बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी नेसलेल्या साडीच्या पदरावरचं कमळ !

मोदी इफेक्ट ! बांगलादेशात कमळ फुललं ! अशा आशयाचा मजकूर समाजमाध्यमात पसरलाय. भाजपा समर्थकांचा हा दावा आहे की बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाच्या मोदींच्या दौऱ्याच्या निमित्ताने शेख हसीना यांनी नेसलेल्या साडीच्या पदरावर कमळ होतं. हा केवळ योगायोग होता की शेख हसीना यांनी हेतूत: केलं होतं, याची चांगलीच चर्चा रंगलीय.

राजकीय फायद्याच्या अशा कुठल्याही बाबतीत सोयिस्कर चर्चेचा धुरळा उडवून देण्यात क्वचितच कोणी भाजपाचा हात पकडू शकेल. जे जसं नाही, ते तसं आहे, हे ठसवणं भाजपाचा हातखंडा झालाय. महाकाय प्रसार-प्रचार प्रणालीद्वारे अशा प्रपोगंडांचं कामही सोपं होतं.

अर्थात, हे पहिल्यांदा होत नाहीये.

संयुक्त राष्ट्रात भारताने गांधी१५० कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, तेव्हाही हाच प्रकार करून झालाय. बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी त्या कार्यक्रमात कमळ फुलांनी नटवलेली साडी नेसली होती, याची सविस्तर स्वतंत्र बातमी भाजपाचं मुखपत्र म्हणवलं जाणाऱ्या एएनआयने आवर्जून दिली होती. पण तेव्हा निवडणुकांची पार्श्वभूमी नव्हती. आताची चर्चा पश्चिम बंगाल निवडणुकीच्या संदर्भाने होतेय, त्यामुळे तिचं महत्त्व आहे.

पण मूळात शेख हसीना यांच्या साडीवरचं फूल कमळ नाहीये. ते आहे वाॅटरलीली अर्थात कुमुदिनी ! कुमुदिनी उर्फ वॉटर लिली हे एक जल-वनस्पतीचे कुळ असून बहुतेक वेळा यांना कमळ समजले जाते. किंबहुना यातील काही प्रकारांना कमळ म्हणूनच ओळखले जाते.

बांगलादेशात ते शापला म्हणून ओळखलं जातं. या फुलाचं वैज्ञानिक नाव Nymphaea nouchali ! ते निंफिएसी परिवारातील आहे. बांगलादेशचं ते राष्ट्रीय फूल आहे.

शापला आणि कमळात अनेक लक्षणीय फरक आहेत. कमळाचं वैज्ञानिक नाव निलंबो नुसिफेरा Nelumbo nucifera आहे. ते निलंबियासी परिवारातील फूल आहे. महत्त्वाचं म्हणजे कमळ हेसुद्धा भारताचं राष्ट्रीय फूल आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!