‘त्या’ काका मामा म्हणायच्या ; पण तो निव्वळ विकृत पुरुष होता !

‘त्या’ काका मामा म्हणायच्या ; पण तो निव्वळ विकृत पुरुष होता !

‘त्या’ काका मामा म्हणायच्या ; पण तो निव्वळ विकृत पुरुष होता !

एक चिमुकली सात वर्षाची ; तर दुसरी अवघी चार वर्षांची ! तो घरी आला की त्या धनु मामा, धनु काका म्हणत त्याला बिलगायच्या. पण तो निव्वळ एक पुरुष होता. त्यातली एक तर खरोखरच त्याची पुतणी होती ; तरीसुद्धा मनातल्या विकृतीला तो आवर घालू शकला नाही. लैंगिक वासनेच्या पूर्ततेसाठी आपण आपल्याच परिचयाच्या चिमुकलींवर अत्याचार करतोय, ही भावनाही त्याला शिवली नाही त्याला केवळ करायचं होतं स्वत:चं लैंगिक शमन ! अत्याचाराची घटना चार दिवसांनी उघडकीला आली. फलटणच्या झिरपेवाडीत घडलेल्या त्या घटनेने पोलिससुद्धा हादरलेत.

धनंजय बाजीराव गायकवाड हा २८ वर्षांचा युवक ! फलटणच्या झिरपेवाडीत राहणारा. गावात मोठ्या संख्येने असलेल्या अनेक अविवाहित युवकांपैकी एक. वर्दीवर ड्राईव्हिंगचं काम करणारा.

तिथल्याच एका कुटुंबासाठीही अधूनमधून ड्राईव्हिंगचं काम केलेलं असल्याने त्याच्याशी कुटुंबातील लहान मुलं परिचित होती. ७ वर्षांची लहानगी त्याला धनुमामा म्हणायची आणि चार वर्षांची चिमुकली धनुकाका म्हणायची. तिचा तर तो खरोखरच काका होता. त्याच्या चुलत भावाचीच मुलगी.

२६ जुलैला आरोपी धनंजयने दोघींना, तुम्हाला भेळ खाऊ घालतो, म्हणून घरी नेलं आणि दोघींवर बलात्कार केला. चिमुकली भूक लागली म्हणून रडू लागली, घरी जायचंय म्हणून विनवू लागली, त्यामुळे ती बचावली ; पण लहानगीला त्याने लक्ष्य केलं. दोघींना त्याने कोणाला काही सांगायचं नाही, म्हणून धमकावलं पण होतं.

घरी आल्यावर दोघी गप्पच होत्या. दरम्यान लहानगीला ताप भरला होता. पण कारण कळत नव्हतं. चार दिवसांनी चिमुकलीने लहानगीच्या आईला घडला प्रकार सांगितला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलीच्या तापाचं कारण लक्षात आल्यावर त्यांना रडू कोसळलं. त्यांनी मुलीला हळूहळू विचारलं, शरीर तपासलं आणि धनंजयची विकृती समोर आली.

बलात्काराची घटना जरी नव्याने उघडकीस आलेली असली तरी मुलींशी लैंगिक चाळे करण्याचा धनंजयचा नीचपणा नवा नव्हता. २६ जुलैला त्याने हलकटपणाची परिसीमा गाठली होती.

धनंजय गायकवाडची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, असं असलं तरी त्याच्या मेंदूत घर करून बसलेली लैंगिक विकृती त्याला गुन्हेगारी मार्गावर घेऊन गेली.

फलटण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी घटनेचे अनेक कंगोरे मिडिया भारत न्यूज शी बोलताना उलगडून सांगितले.

आपल्या समाजात बलात्काराच्या घटनेनंतर स्त्रीयांना दोष देण्यावर, त्यांना पेहराव, वागण्यावरून उपदेश करण्यावर लोकांचा जोर असतो. त्यात स्त्रीयाही पुढे असतात. पण जेव्हा लहानग्यांवर अत्याचार होतात, तेव्हा काय कारण असतं, यावर समाज बोलत नाही. गोव्यातील बलात्काराच्या ताज्या घटनेत तिथल्या मुख्यमंत्र्यांनी मुलींच्या पालकांना दोष दिला.

पालकांचं मुलींवर लक्ष हवं, असं विधान गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं. पण निरागसतेवर एखादा जवळचा काकामामाच तुटून पडतो, तेव्हा पालकांनी काय करायचं ? याचं उत्तर समाजाकडे नसतं.

समाजमाध्यमात स्त्रीयांना बलात्काराची उघड धमकी देणं, ज्या समाजात एक सर्वसाधारण बाब बनलीय, त्या समाजाकडे पुरुषी विकृती विरोधात समस्या निवारण असू शकतं काय?

आरोपी धनंजय बाजीराव गायकवाड यांच्या विरुद्ध, फलटण शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७६ (२)(आय), ५०७, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे व सह तपासी अधिकारी म्हणून,पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे हे करीत आहेत.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!