संविधानिक अधिकार जतन करण्यासाठी जागरूक राहूया ; दिलीप तळेकरांचं आवाहन ! कणकवलीत कास्ट्राईबचा संविधान दिन !!

संविधानिक अधिकार जतन करण्यासाठी जागरूक राहूया ; दिलीप तळेकरांचं आवाहन ! कणकवलीत कास्ट्राईबचा संविधान दिन !!

संविधानिक अधिकार जतन करण्यासाठी जागरूक राहूया ; दिलीप तळेकरांचं आवाहन ! कणकवलीत कास्ट्राईबचा संविधान दिन !!

आपल्याला एकसमान दर्जा, हक्क व अधिकार संविधानामुळे प्राप्त झाले आहे. आपण जागरूक राहून आपल्या अधिकारांचं जतन केलं पाहिजे, असं वक्तव्य कणकवली पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी संविधान दिनी केलं.

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने सिंधुदुर्गात कणकवलीतील पंचायत समितीत संविधान दिन साजरा करण्यात आला. सभापती दिलीप तळेकर, गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी लाड, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, शिक्षण विस्तार अधिकारी पाताडे उपस्थित होते.

यावेळी कास्ट्राईबच्या तालुका सचिव नेहा कदम यांनी संविधान उद्देश्यिकेचं वाचन केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष किशोर कदम यांनी केलं.

पंचायत समितीला संविधानाची प्रत भेट देण्यात आली व कोविड कलावधीत ‘शिक्षण आपल्या दारी’ स्वाध्याय पुस्तिकेचं वाटप करण्यात आलं, यासाठी संघटनेच्या वतीने अभिनंदन पत्र देण्यात आलं. शिक्षण विभागासाठी दोन रिम कागद देण्यात आलं.

उपस्थितांना अजय कांडर यांचा ‘युगानुयुगे’ हा कविता संग्रह भेट देण्यात आला.

सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष संदिप कदम तर आभार प्रदर्शन जिल्हा सचिव विकास वाडीकर यांनी केलं.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!