चंद्रावर यान उतरवणं सोपं नाही, पण…

चंद्रावर यान उतरवणं सोपं नाही, पण…

चंद्रावर यान उतरवणं सोपं नाही, पण…

चंद्रावर यान उतरवणं ही इथं बसून इमॅजिन करण्याइतकी सोपी आणि स्वस्त गोष्ट नक्कीच नाही. कुठल्याही अवकाश मोहिमेत गुरुत्वाकर्षणाचे अचूक खेळ करत लँडिंग करणे हे सगळ्यात खतरनाक काम असते. पुण्यामुंबईतल्या रस्त्यांवर चढउतारांवर वेगात ब्रेक दाबताना आपली भीतीने गाळण उडते, तर अंतराळात काय घडत असेल हा विचारच करायला नको.

ह्या सगळ्याच प्रकारात नासा ने १९६९ सालीच म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी अपोलो ११ माणसासकट चंद्रावर उतरले, ही विज्ञानयुगातील भयावह अनाकलनीय जबरदस्त गोष्ट घडली. माणूस चंद्रावर उतरवण्यासाठी जवळपास सतरा अपोलो मोहिमांत सर्व मिळून बत्तीस ऍस्ट्रोनॉट्स मधल्या चोवीसजणांनी चंद्राला जिगरबाज घिरट्या घातल्या आणि त्यातले बाराजन चंद्रावर भक्कम पाय रोवून आले, ह्यातले तीन मरणाच्या अंतराळ दाढेत शरीराचा कोळसा होऊन आहुती देऊन गेले. असंख्य अपयश पचवून माणसाने शेवटी चंद्रावर विजय मिळवला. विज्ञानाने धर्माच्या आरपार कानठळीत वाजवायचा हा प्रकार झाला.

इथे ना पुष्पक विमानाची थियरी ना राशीतला चंद्र ना कुठल्या पौर्णिमेचे पावित्र्य ना कुठल्या अमावस्येचे भय…खरी विज्ञानवादी वृत्ती अंगात संचारलेला देश आणि समाज काय जबरदस्त कामगिरी करू शकतो ह्याचे उदाहरण म्हणजे अमेरिका आणि नासा.

हे सगळं घडून येत असताना आमचं यान कसं नासा पेक्षा हॉलिवूड फिल्म च्या बजेट पेक्षा स्वस्तात आहे वगैरे हे सांगण्याचा भारतीय देशभक्तांना मोह मात्र आवरत नाही. विज्ञानाला देशभक्तीशी काडीचेही देणेघेणे नसते. बऱ्याच भक्तांना पाकिस्तानला ट्रोल करण्यासाठी यान उतरायला हवं होतं, पण त्यांचाही वाईट्ट हिरमोड झाला. खोटं बोलून बोलून हल्ली जरा थंडावलेल्या मोदींना भाषणाला नवे मुद्दे मिळाले असते ते ही बारगळलं. देशाच्या पंतप्रधानाने असल्या मोहिमेच्या अवघड क्षणात उगीचच उपस्थितीत राहून शोबाजी करू नये असा एखादा प्रोटोकॉल असायला हवा होता असं चांद्रयान लाईव्ह पाहताना वाटून गेलं.

इस्रोच्या काही बॉसेस ने सुद्धा टुकार देवभोळेपण, जोतिषाचा सल्ला घेणे असले हलकट प्रकार थांबवले पाहिजेत. अफाट मेहनतीची किंमत कमी करण्याचे हे सनातनी धंदे आहेत. तिथल्या अस्सल वैज्ञानिकांनी जवळपास दहा बारा वर्षे ह्यावर अपार मेहनत घेतली असावी. अजून घ्यावी लागेल, घेतील. ही फक्त सुरुवात आहे.

इस्रोचे अभिनंदन आणि पुढील प्रयत्नांसाठी शुभेच्छा.


मयुर लंकेश्वर

लेखक सॉफ्टवेअर इंजिनीअर असून, समाजमाध्यमांवर सामाजिक विषयावर लिखाण करतात.


आपली प्रतिक्रिया लेखाखालील प्रतिसाद रकान्यात जरूर द्या व आवडल्यास लेख शेअर करा.

चांद्रयान संदर्भातील इतर लेख/बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा :

https://kaydyanewaga.com/isro-sivan/

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!