चीनमधील बँकेचं भारताला मोठं कर्ज !

चीनमधील बँकेचं भारताला मोठं कर्ज !

चीनमधील बँकेचं भारताला मोठं कर्ज !

बीजिंगमध्ये मुख्यालय असलेल्या “एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँके”ने (आशियाई पायाभूत सुविधा बँक किंवा एआयआयबी) कोविडचा मुकाबला करण्यासाठी भारताला साडेबाराशे दशलक्ष डॉलर्स किमतीच्या कर्ज दिलं आहे.

मे महिन्यात, आशियाई बँकेने भारताला कोरोनामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन स्थितीत मदत करण्यासाठी ५०० दशलक्ष कर्जास मान्यता दिली होती. आता नव्याने ७५० दशलक्ष डॉलर्स किंमतीच्या कर्जाला मान्यता देण्यात आली आहे.

कोरोना व्हायरस साथीच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांना तोंड देण्यास भारताला मदत होईल, असे आशियाई बँकेने म्हटलं आहे.‌ राॅयटर्सने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

७५० दशलक्ष डॉलर्स म्हणजे अंदाजे ५ हजार ७१४ कोटी रुपयांचे कर्ज घेत आहे. आशियाई बँकेचे भारतावर आता १.२५ अब्ज डॉलर्सचे कर्ज झाले आहे. आशियाई बँकेच्या सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांना कोरोनाविरुद्ध लढण्यासाठीच्या १० अब्ज डॉलर्सच्या निधी सुविधेचा ही दोन्ही कर्ज भाग आहेत.

News by Mangesh Asrondkar

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!