दिवाळीच्या निमित्ताने गेली २० वर्ष सामाजिक बांधिलकी जपतंय सीएचएम महाविद्यालय

दिवाळीच्या निमित्ताने गेली २० वर्ष सामाजिक बांधिलकी जपतंय सीएचएम महाविद्यालय

दिवाळीच्या निमित्ताने गेली २० वर्ष सामाजिक बांधिलकी जपतंय सीएचएम महाविद्यालय

सामाजिक बांधिलकी ही मूर्त रूपात दाखवता येत नाही पण आपल्या वर्तनातून ती साकारता येते. ही जाणीव एका पिढीकडून दुस-या पिढीकडे हस्तांतरित करावी लागते. सामाजिक भान जपणारं असंच एक उदाहरण म्हणजे उल्हासनगरमधील श्रीमती चांदीबाई हिंमथमल मनसुखानी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी !

पनवेल, नेरे शांतिवन – कुष्ठरोग निवारण समिती २००० सालापासून, गेली एकोणीस वर्षे सीएचएम महाविद्यालयाचे विद्यार्थी दिवाळी साजरी करतायत. यंदाही दिवाळीच्या आदल्या दिवशी शांतिवनात दीपप्रभात व दीपसंध्या अशा दोन सत्रांत विविध सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले.

शनिवार २६ ऑक्टोबर २०१९ रोजी सीएचएम महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी शांतिवन येथे दिवाळी उत्सव साजरा केला. शांतिवनच्या रामकृष्ण निकेतन वृद्धाश्रमात असणा-या आजीआजोबांना सीएचएमच्या विद्यार्थ्यांची दिवाळी जिव्हाळ्याची असते. यावर्षीही उपस्थित विद्यार्थ्यांनी कंदिल लावणं, रांगोळी काढणं, प्रेमपूर्वक सर्व आजीआजोबांना सांस्कृतिक कार्यक्रमाचं आमंत्रण देणं, प्रत्यक्ष कार्यक्रमात त्यांना सहभागी करून घेणं यामुळे ह्या दीपोत्सवाला आणखीनच मायेची स्निग्धता लाभली. दीपसंध्येच्या सांस्कृतिक कार्यक्रमात शांतिवनातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच सहभाग सुखावणारा होता.

सीएचएम महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर आहेत. कामाच्या व्यस्ततेतूनही शांतिवनातील दिवाळीसाठी सर्वजण एकत्र येतात. कार्यक्रमांची आखणी व सबंध दिवसभराचं नियोजन करतात. वैयक्तिक वर्गणीतून शांतिवनला आर्थिक सहकार्य करतात. या दिवाळीतही विद्यार्थ्यांनी ही जबाबदारी आनंदाने पार पाडली. शांतिवनातून मिळणारी उर्जा वर्षभर विद्यार्थ्यांना बळ देते.

गेल्या एकोणीस वर्षांत सीएचएमचे विद्यार्थी व शांतिवनमधला दीपोत्सव यांचा आता अतूट स्नेहबंध निर्माण झाला आहे. महाविद्यालयाचे पूर्वप्राचार्य आणि एचएसएनसी बोर्डचे सचिव आदरणीय पंजवानी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेला हा आनंदोत्सव डाॅ.ज्योतिका ओझरकर यांनी सुरू ठेवला. आज या दीपानंदात महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख नीतिन आरेकर आपल्या विद्यार्थ्यांसमवेत स्नेह ओतत ही ज्योत प्रज्वलित ठेवतायत. या प्रसंगी वैयक्तिक वर्गणीतून ₹ ४३,३५०/- ची देणगी शांतीवनला देण्यात आली.

शांतिवनचे संचालक तसेच सहकारी यांनी दीपोत्सवात सहभागी होऊन विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. विवेक भागवत, जुई गडकरी, तेजल जडये, अदिती मुळ्ये, सचिन मुळ्ये, आशा करमरकर, आदित्य गोळे, सौरभ पैठणकर, निषाद जोशी, हेमंती कुलकर्णी इ. माजी विद्यार्थी कुटुंबियांसमवेत उपस्थित होते. स्वरांगी ताम्हनकर, गंधाली दाते, अथर्व शेवडे इ. कला-वाणिज्य शाखेत सद्या शिकत असणारे विद्यार्थी आणि मराठी विभागाचे सहकारी शिक्षक यांचा सहभाग होता.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!