मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता तळागाळापर्यंत नेण्याचा सामाजिक संस्थांचा निर्धार !

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता तळागाळापर्यंत नेण्याचा सामाजिक संस्थांचा निर्धार !

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता तळागाळापर्यंत नेण्याचा सामाजिक संस्थांचा निर्धार !

रुग्णमित्र विनोद साडविलकर व धनंजय पवार यांच्या संकल्पनेतून रुग्णमित्रांच्या संस्थाभेट उपक्रमांतर्गत मुंबई परिसरातील सामाजिक संस्था प्रतिनिधींनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाला भेट दिली आणि कक्षाची कार्यपद्धती जाणून घेतली. प्रसन्न फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रद्धा अष्टीकर यांनी या भेटीचं आयोजित केलं होतं.

रुग्णांना स्वतःच्या उपचाराकरिता अर्थसहाय्य जमा करण्यास अनेक कसरती कराव्या लागतात. अशातच एखादा रुग्ण गंभीर आजाराने त्रस्त असल्यास त्यासाठीची आर्थिक मदत मिळवण्यासाठी "मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदतीच्या अपेक्षेने प्रयत्नशील राहतो. अशा रुग्णांना येणाऱ्या अडचणी, अर्जामधील राहणाऱ्या त्रुटी तसंच या कक्षाची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी ही भेट होती, अशी माहिती विनोद साडविलकर यांनी मीडिया भारत न्यूजला दिली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे नवनियुक्त कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे यांनी या बैठकीत मार्गदर्शन केलं. यावेळी रुग्णमित्रांतर्फे मंगेश चिवटे साहेबांचा शाल, स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

आमची वसईचे रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांची वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्ष मुंबई शहर व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन मुंबई शहर करीता वैद्यकीय सहाय्यक समन्वयकपदी नियुक्ती झाली म्हणून रुग्णमित्रांसमक्ष मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अर्चना गावंड (AAO), संजय तांबे (AAO) यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची कार्यपद्धती उपस्थितांना समजावून सांगितली.

हृदयरोग, मेंदुरोग, नवजात बालके, मूत्रपिंड प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, अपघात, कर्करोग, डायलिसिस, हृदय प्रत्यारोपण, CVA व बोन मॅरो ट्रान्सप्लांट सारख्या ११ गंभीर आजारांवर (a) राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम RBSK स्कीम (b) महात्मा फुले जन आरोग्य योजना MJPJAY (c) धर्मादाय नियम अंतर्गत (मोफत / माफक) याचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यात या योजनेत नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत केली जाते.

रुग्ण डिस्चार्ज झाल्यावर त्याला अर्थसहाय्य मिळत नाही. तसंच महाराष्ट्राबाहेरील रुग्णालयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळत नाही. महात्मा फुले जन आरोग्य योजनेची समितीच्या शिफारसीनुसार व त्यांनी अर्थसहाय्य करण्याची शिफारस केली असता रकमेच्या ५०% अनुदान प्रदान केले जाते.

अर्ज सोबत जोडायची कागदपत्रे

१. अर्ज (विहित नमुन्यात)
२. वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक डॉक्टरचे प्रमाणपत्र त्यांच्या सहीशिक्का सोबत असणे अनिवार्य आहे.
खासगी रुग्णालये असल्यास सिव्हिल सर्जन कडून प्रमाणित केलेले असले पाहिजे.
३. उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालय (वार्षिक १,६०,०००/- च्या खालचा )
४. रेशन कार्ड, आधारकार्ड (दोन्ही महाराष्ट्राचे)
५. संबंधित आजाराचे रिपोर्ट असणे गरजेचे आहे.
६. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी च्या संगणक प्रणालीत असणे आवश्यक आहे.
७. अपघात असल्यास FIR अथवा MLC आवश्यक कागद
८. अवयव प्रत्यारोपण असल्यास रुग्णालयाचे मान्यता प्रमाणपत्र अथवा ZTCC येथे नोंदणी केलेली पावती असणे आवश्यक असते.
९. अर्जदाराची मागणी ईमेलद्वारे असल्यास अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे pdf स्वरूपात पाठवावीत तसंच मुळप्रत मुख्यमंत्री सहायता निधीकडे टपालाद्वरे तत्काळ पाठवावी (स्पीड पोस्ट).

Email Id-aao.cmrf-mh@gov.in
संपर्क (०२२) २२०२६९४८
TOLL FREE - 8650567567

या बैठकीत कक्षप्रमुख यांनी उपस्थित रुग्णमित्रांच्या सूचना, अडचणी नोंदवहीत उतरवून घेतल्या. स्व बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना एकत्रित करून योजना सुरू करण्याची सूचना आमची वसईचे रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी केली.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षास राज्यातील ३००० हून अधिक रुग्णालये जोडली गेलेली आहेत. अजून रुग्णालये जोडावीत, असं आवाहन मंगेशजी चिवटे साहेब यांनी रुग्णमित्रांना केलं. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा विस्तार तळागाळात पोहचवू असं आश्वासनरुग्णमित्रांनी दिलं. दर सहा महिन्यांनी अशी आढावा बैठक घेण्याचं कक्षप्रमुखांनी घोषित केलं.

सतीश जाधव (स्वामी भक्त अन्नछत्र केईएम), अमेय गिरकर, किरण गिरकर (रितेश चॅरिटेबल ट्रस्ट), श्रीविद्या सरवणकर (ईश्वर चॅरिटेबल ट्रस्ट), ज्योती जोशी (ज्योत चॅरिटेबल ट्रस्ट), अमृता पुरंदरे ( आरंभ सामाजिक प्रतिष्ठान), पूनम आरेकर, अजय उबाळे (प्रसन्न फाउंडेशन), प्रदीप कुलकर्णी (साद फाउंडेशन), मिनाक्षी वेलणकर (मंदार फाउंडेशन), राम भोजने (ऑरनेक्ट टेक्नो), दिनेश गोसावी, दिनेश बैरीशेट्टी, नवीनकुमार पांचाळ (दिशा वेल्फेअर सामाजिक संस्था), समीर अन्सारी (महामानव फाउंडेशन), संदिप पाटील (महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ), प्रसाद मांडवकर ( अजिक्य युवा प्रतिष्ठान), गणेश सोनावणे (जिवनदान ट्रस्ट), वैशाली सोनावणे, प्राची लोखंडे, स्नेहा हिरे, शीतल वानखेडे, आशा लिहीटकर, संगीता सावंत ( जिजामाता सामाजिक संस्था), प्रकाश राणे (विठ्ठल रुक्मिणी मंदिर), सुभाषराव गायकवाड ( आरोग्य मित्र नागेबाबा संस्था), डॉ. मिहीर देशपांडे, डॉ. मिनाज पटेल (रेड प्लस ब्लड बॅक), रूग्ण मित्र रमेश चव्हाण, जयकिसन डुलगच, अमिता शर्मा, ज्योती धुमाळ, डॉ. अलका थरवळ, नयन साळवी, दिशा साळवी, संतोष वेंगुर्लेकर, चारूदत्त पावसकर, प्रविण खेडेकर, रोहन पालकर, डॉ. अशोक अढायगे, संजय मोरे, लक्ष्मीकांत जाधव, संध्या भंडारे, संजय मोरे, लक्ष्मीकांत जाधव या मान्यवरांनी बैठकीत उपस्थिती दर्शवली.

मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षातील निलेश देशमुख, स्वरूप काकडे, राहुल भालेराव, ऋषीकेश देशमुख यांनी या संस्थाभेटीचं उत्तम नियोजन केलं. रूग्णमित्र विनोद साडविलकर यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केलं.


संबंधित बातमीचा विडिओ पाहण्यासाठी क्लिक करा :

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!