राज्यातला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी सहकारी बँक कर्मचारी सरसावले !

राज्यातला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी सहकारी बँक कर्मचारी सरसावले !

राज्यातला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी सहकारी बँक कर्मचारी सरसावले !

राज्यात उद्भवलेला रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदानाचं आवाहन केलं होतं. त्याला प्रतिसाद म्हणून कॉ-ऑपेरटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन पुढे सरसावली. युनियनच्या पुढाकाराने झालेल्या रक्तदान शिबीरात २०८ कर्मचाऱ्यांनी योगदान दिलं. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या शिबिराचं उद्घाटन केलं.

केईएम रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने युनियनच्या दादर येथील कार्यालयाच्या आवारात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. को-ऑपेरटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सहकारी बँकेतील २७७ कर्मचाऱ्यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला होता. या पैकी २०८ रक्तदात्यांनी रक्तदान केलं. को-ऑपेराटीव्ह क्रेडिट सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा या शिबिरात सहभाग घेतला.

या शिबिरासाठी ६२३ जणांनी नोंदणी केली होती. पण कोविडबाधा होऊन गेलेल्यांना नाकारण्यात आलं. अशी माहिती युनियनचे सरचिटणीस नरेंद्र सावंत यांनी दिली.

रक्तदानासारख्या पवित्र कामाचं नियोजन आनंदराव अडसूळ यांच्यासारखा जमिनीवर पाय असलेला शिवसेनेचा नेताच करू शकतो ; कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार त्यांच्या नसानसात भिनले आहेत, असे गौरोवोद्गार महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी सदिच्छापर भाषण देताना काढले.

युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, सल्लागार कॅ. अभिजीत अडसूळ, खजिनदार प्रमोद पार्टे व युनियनचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!