आनंदराव अडसूळांचं थेट गोयलांना साकडं !

आनंदराव अडसूळांचं थेट गोयलांना साकडं !

आनंदराव अडसूळांचं थेट गोयलांना साकडं !

सहकारी बँक कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवास करू देण्यासाठी को आॅप बँक एम्प्लाॅईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी आज पुन्हा एकदा केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना साकडं घातलं आहे.

अडसूळ यांनी गोयल यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व आपलं म्हणणं मांडलं. राज्याचे मुख्य सचिव आणि गृहमंत्र्यांनी परवानगी दिल्यास आपली काहीच हरकत नसल्याचं त्यावेळी गोयल यांनी सांगितलं.

तोच संदर्भ घेऊन आता अडसूळ यांनी राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांना निवेदन दिलं आहे. अनलाॅकच्या पहिल्या टप्प्यात बँक कर्मचाऱ्यांना वगळण्यात आलं होतं, तर आता बँक कर्मचाऱ्यांना अंतर्भूत केल्यानंतर सहकारी बँक कर्मचाऱ्यांना बाहेर ठेवण्यात आल्याचं अडसूळ यांनी मुख्य सचिवांच्या निदर्शनास आणलं आहे.

को आॅप बँक एम्प्लाॅईज युनियन शिवसेनेच्या ताब्यात आहे. शिवसेनेचा राज्यात मुख्यमंत्री आहे. रेल्वे प्रवासाच्या परवानगीचा चेंडू राज्य सरकारकडे आल्यामुळे आता मार्ग निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!