महागडं पेट्रोल भरणाऱ्या वाहनचालकांचं महिला काॅंग्रेसकडून औक्षण ! हिंमत व सहनशीलतेचं कौतुक !!

महागडं पेट्रोल भरणाऱ्या वाहनचालकांचं महिला काॅंग्रेसकडून औक्षण ! हिंमत व सहनशीलतेचं कौतुक !!

महागडं पेट्रोल भरणाऱ्या वाहनचालकांचं महिला काॅंग्रेसकडून औक्षण ! हिंमत व सहनशीलतेचं कौतुक !!

सतत पेट्रोल आणि डिझेल मध्ये दर वाढ करून केंद्र सरकारने सामान्य माणसाचं जगणं कठीण केलं आहे. पेट्रोल आज १०६ रूपये लिटर तर डिझेल ९७ रुपये लिटर वर पोचलं आहे आणि सामान्य माणसाला ते परवडेनासं झालं आहे. सरकारने लोकांचा नाईलाज केलेला असला तरी इतकं महागडं इंधन भरण्याची हिंमत व सहनशीलतेचं कौतुक करत महिला काॅंग्रेसने पेट्रोल पंपावर वाहनचालकांचा सत्कार केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नाना पाटोले यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात ८ ते १७ जुलै पर्यँत केंद्र सरकारने लादलेल्या महागाई विरोधात आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात महिला काँग्रेसदेखील मैदानात उतरली आहे. त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर जिल्हापरिषदेसमोरील पेट्रोल पंपावर वाहनचालकांच्या कौतुक वजा सत्काराचे अनोखे आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपावर येणाऱ्या वाहनचालकांचं औक्षण करून त्यांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचा सहनशीलतेचं कौतुक केलं.

नागरिकांनी मात्र ही सहनशीलता नसून हतबलता असल्याचं सांगितलं व वेळ येताच मोदी सरकारला धडा शिकवू, अशा संतप्त भावना व्यक्त केल्या.

तया आंदोनासोबतच महिला काँग्रेसकडून महागाईच्या विरोधातही नागरिकांच्या स्वाक्षरी अभियानाची सुरवात करण्यात आली. येत्या १७ तारखेपर्यंत संपूर्ण शहरात हे साक्षरी अभियान राबावण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी मिडिया भारत न्यूज ला दिली.

या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर, माजी महापौर संगीता अमृतकर, अनुसूचित विभागाच्या महिला जिल्हाध्यक्षा अनु दहेगावकर, जिल्हा उपाध्यक्षा सुनीता धोटे, जिल्हा उपाध्यक्षा हर्षा चांदेकर, ब्लॉक अध्यक्षा शितल काटकर, उपाध्यक्षा स्वाती त्रिवेदी, सदस्य लता बारापात्रे, अनुसूचित च्या महिला शहर अध्यक्षा शालिनी भगत,माजी नगरसेविका वंदना भागवत, मुन्नी मुमताज शेख, चंदा वैरागडे, पायल दुर्गे, कविता मेश्राम, सबिया पठाण, संगीता बोरकर, अनिता दातार, डेझी सोंडूले, पार्वती चिवाल, पायल खांडेकर, श्रद्धा बावणे, कविता बोरकर यांची उपस्थिती होती.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!