
कवी, लेखक, भाषाअभ्यासक
MA, B.Ed., JRF, NET, SET (Marathi)
व्यवसाय : साहा. प्राध्यापक
कायद्याने वागा लोकचळवळ यांची साहित्य-सांस्कृतिक शाखा असलेल्या 'महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्थे'च्या वृषाली विनायक अध्यक्ष असून झिम्माड काव्यसमूहाच्या मुख्य समन्वयक आहेत.
वृषाली विनायक यांच्या स्त्री-जाणीवेच्या कवितांनी मराठी कवितेत स्वतःचा ठसा उमटवला आहे. तंत्रज्ञान पिढीचे प्रतिनिधित्व त्यांच्या कवितेत जसे आहे तसेच साहित्यिक उपक्रमशीलतेतही आहे.
कवितेकडे गांभीर्याने बघणारी ही कवयित्री स्वतःच्या कवितेबाबतही तितकीच काटेकोर आहे. नवनव्या प्रतिमांमधून आपल्या अनुभवविश्वाची काव्यात्म मांडणी वृषाली विनायक करतात. त्यांच्या कवितेतील अनुभवविश्व थेट भिडणारे आहे.
बेगडीपण, कृत्रिमता त्यांच्या कवितेला मानवत नाही. अनुभवाचा स्पष्ट उद्गार वृषाली विनायक यांची कविता करते.
वृषाली विनायक यांचा साहित्य क्षेत्रातला वावर जसा प्रभावित करणारा आहे. तसेच त्यांचे सामाजिक भानही अधोरेखित आहे. समाजातली प्रत्येक घटना बारकाईने टिपत आपल्या लेखणीने त्याचा उहापोह त्या करतात. राज्यस्तरीय कविसंमेलन, परिसंवाद, चर्चासत्रे यांत निमंत्रित कवी, वक्ता म्हणून त्यांचा सहभाग असतो.
महाराष्ट्र शासन कार्यसंचालनालय आयोजित गदिमा, पु.ल.देशपांडे, बाबुजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लेखन कार्यशाळेत विषयतज्ज्ञ म्हणून त्यांची उपस्थिती होती.
कायद्याने वागा लोकचळवळीतर्फे 'बोलू कवतिके' या मुलाखत वेब सिरीजच्या माध्यमातून मराठीत अक्षरठसा उमटविणाऱ्यां मान्यवर साहित्यिकांचे दस्तावेजीकरण करण्याचे काम त्या करत आहेत.
मराठीतील नामवंत कवी/लेखक यांचा सहभाग असलेल्या झिम्माड महोत्सवाचे सलग तीन वर्षे त्यांनी यशस्वी आयोजन केले आहे.
शैक्षणिक क्षेत्रातही नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून त्या सक्रिय असतात. कायद्याने वागा लोकचळवळीचा भाषिक कौशल्य विकसनास पूरक असणारा 'बोरूची शाळा' या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची रचना वृषाली विनायक यांनी केली आहे. राज्य शासनाच्या ग्रंथ महोत्सवात शिक्षकांसाठी या अभ्यासक्रमाचे परिचय सत्र देखील आयोजित करण्यात आले होते.