कोविड संकटाने आपले प्राधान्यक्रम ठरवण्याचा शहाणपणा दिलाय !

कोविड संकटाने आपले प्राधान्यक्रम ठरवण्याचा शहाणपणा दिलाय !

कोविड संकटाने आपले प्राधान्यक्रम ठरवण्याचा शहाणपणा दिलाय !

म्हसवड नगरपालिका क्षेत्रात पालिकेची सार्वजनिक आरोग्य सेवासंदर्भातली नियमित कार्यक्षमताच जर मर्यादित असेल तर मग कोरोना काळात कोरोना बाधित रुग्णांचे काय? नगरपालिकेच्या हद्दीत जे शासकीय रुग्णालय आहे ते नगरपालिकेच्या अखत्यारीत येत नाही, तर ते जिल्हापरिषद साताराच्या अखत्यारीत येते.

म्हसवड नगरपालिका हद्दीतील व म्हसवड पंचक्रोशीतील जवळजवळ 56,000 लोक त्याच प्राथमिक आरोग्यकेंद्रावर अवलंबून आहेत. प्राथमिक आरोग्यकेंद्रात दोन वैद्यकिय अधिकारी आणि त्यांचे मोजकेच आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना काळात ह्या अपुऱ्या यंत्रणेवर कामाचा प्रचंड भार पडत आहे. काही कंत्राटी डॉक्टर्स आणि नर्सेसही आता कोरोना बाधित रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता नेमलेले आहेत. त्यांचीही संख्या अपुरीच आहे.

भाग दुसरा

म्हसवड क वर्ग नगरपालिका हद्दीत कोव्हिड सेंटर आहे. ज्याची मर्यादा सीसीसी बेड-75 आहे ; पण प्रत्यक्षात तिथे150 कोरोना बाधित रुग्ण आहेत. ऑक्सीजन बेड 24 आहेत. व्हेंटीलेटरची सुविधाच नाही.

कोरोना बाधित रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक औषधे पुरविते. ऑक्सीजनची गरज असणाऱ्या रुग्णांना सुविधा पुरवण्याची 24 रुग्णांच्या पुढे प्राथमिक आरोग्य केंद्राची क्षमता नाही. ही 24 ऑक्सिजन बेडची तरतुदही होण्यामागे शहरातील सेवाभावी संस्थांचा मोठा वाटा आहे.

 

म्हसवड आणि परिसरातील 56,000 लोकसंख्या म्हसवडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून असताना ह्या अशा सार्वजनिक आरोग्य सेवेच्या तोकड्या सुविधा आहेत.

कोरोना बाधित रुग्णांचे आकडे वाढत असताना ह्या आपत्तीत शहरामधल्या एका वर्गाची टोकाची सामाजिक असुरक्षितता समोर आली आहे.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कितपत सक्षम आहे, याचे पितळ उघडे पडले आहे. यासाठी फक्त कोणती राजकीय सत्तास्थानं, राजकिय पक्ष किंवा शासकीय धोरणंच जबाबदार नाहीत तर जनताही तेवढीच जबाबदार आहे.

आमचे अग्रक्रम जर मंदिर, मस्जिद आणि चर्च असतील, आमच्या महापुरुषांचा पुतळा उभारण्यातच जर आमच्या जातीच्या, धर्माच्या, राजकिय पक्षाच्या अस्मिता अडकत असतील, तर आता आम्हाला आमचे प्राधान्यक्रम ठरविण्याची वेळ कोरोना महामारीने आमच्यावर आणली आहे.

ह्या कोरोना काळात आमची सार्वजनिक आरोग्यवस्था किती डळमळीत झाली आहे, याकडे आम्ही उघड्या डोळ्यांनी बघितले पाहिजे.

ह्या देशाचे नागरिक म्हणून आरोग्य सुरक्षेची हमी हा आमचा प्राधान्यक्रम असला पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षा ही फक्त सीमेवर नसते तर आरोग्य सुरक्षाही तितकीच महत्वाची आहे. हाच प्राधान्यक्रम इथल्या जनतेचा आणि इथल्या राज्यकर्त्यांचा ही असला पाहिजे. हे शहाणपण तर कोरोनाकाळात आपल्या सर्वाना नक्कीच यायला पाहिजे..

 

 

 

प्रा. कविता म्हेत्रे

( Msc, M.Ed, MA( marathi), Mj)

म्हसवड नगरपालिकेतील माजी सदस्या / सामाजिक राजकीय अभ्यासक / विश्लेषक / वक्ता


सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेलाच ऑक्सिजनची गरज : भाग पहिला वाचण्यासाठी इथे टिचकी मारा :

 

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील खर्चाबाबत राजकीय अनास्था !

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!