लस यायच्या आधीच लुटारू सज्ज आहेत !

लस यायच्या आधीच लुटारू सज्ज आहेत !

लस यायच्या आधीच लुटारू सज्ज आहेत !

इंग्लंडमध्ये लसीकरणाची प्रत्यक्ष सुरुवात झालीय. भारतासहित इतरही अनेक देश लसीकरणाच्या उंबरठ्यावर आहेत. पण सकारात्मक बातम्यांपाठोपाठ जगाच्या दृष्टीने अतिशय धक्कादायक बातमी समोर येते आहे. प्रसिद्ध सुचना प्रौद्योगिक कंपनी इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स कॉर्पोरेशन अर्थात आईबीएम ने जगातील बहुतांश लसी या हैकर्सच्या निशाण्यावर असल्याचा खूलासा केला आहे. या मागे लसीचा काळाबाजार तसंच एखाद्या राष्ट्राचा हात असल्याचंही आईबीएमने म्हटलंय.

संपूर्ण जगात गेले वर्षभर कोरोना विषाणूने हाहाकार माजवल्यानंतर सगळ्या जगासमोर एकच प्रश्न होता की कोरोना लस कधी येणार ? आता कुठे वेगवेगळ्या देशातून लसीसंदर्भात दिलासादायक बातम्या येत आहेत. रशिया आणि भारत तर लसीकरणाच्या उंबरठ्यावर पोहचलेत. भारतातील सिरम इंस्टिट्यूटच्या लसीने फेज ३ चा टप्पा पार केला आणि जानेवारी पर्यंत लसीकरणाला सुरुवात होईल, असे संकेत मिळत आहेत.

इंग्लंडमधील मार्गारेट कीनन या नावाची इतिहासात नवीन नोंद झाली आहे. नाॅर्थन आयर्लंड मधील एन्नीस्किलेन येथील ही नव्वद वर्षीय वयोवृद्ध महिला कोविड प्रतिबंधक लस टोचून घेतलेली जगातली पहिली नागरिक ठरली आहे. तिच्यापासून इंग्लंडमधील लसीकरणाचा प्रारंभही झाला आहे. फाइझर/बायोएनटेकने या लसीची निर्मिती केलीय.

पण आईबीएमच्या म्हणण्यानुसार, त्यांना एका जागतिक सायबर हल्याबाबत माहिती मिळालेली आहे. एका बाजूला जागतिक आरोग्य संघटना लसीच्या वितरणाबाबत विचार करत असतानाच लस पोहचवणारी साखळीच उद्ध्वस्त करण्यासाठी हैकर्स तयारी करत आहेत. साधारण सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच या हैकर्सनी आपली तयारी सुरु केलेली आहे.



सायबर हल्याबाबतचा रिपोर्ट तयार करणाऱ्या आईबीएमच्या विश्लेषक क्लेअर जाबोईवा यांनी आपल्या रिपोर्टमध्ये सदर हल्ल्याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांच्या हाती या हल्ल्याची तयारी किती नियोजनपूर्व केलेली आहे आणि कशाप्रकारे लस वितरणाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, याचे काही पुरावे लागले आहेत.

यासाठी हैकर्सनी चीनच्या हायर बायोमेडिकल या कंपनीचा अदृश्य आधार घेतला. या कंपनीतल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावे लसी संबंधित उपकरणाचे उत्पादन करणाऱ्या मुख्यतः सौर उर्जेशी संबंधित उपकरण बनवणा-या कंपन्या तसंच संस्थांना ईमेल्स पाठवले.

यात युरोपीय आयोगाच्या टैक्स आणि कस्टम युनियन संचालक कार्यालयाचाही समावेश आहे. हे कार्यालय संपूर्ण युरोप संघाचे सिमा शुल्क नियंत्रित करतं. तसंच युरोपात होणाऱ्या लसीच्या आयातीच्या नियमनाची संपूर्ण जबाबदारीही याच कार्यालयाकडे आहे.

आपण अंदाज बांधू शकतो की हा सायबर हल्ला हा एखाद्या मोठ्या स्फोटापेक्षा किंचितही कमी नाही.

आपल्या इमेलमध्ये त्यांनी आपल्याकडे कोरोना लस सुरक्षित ठेवण्यासाठीच्या संपूर्ण यंत्रणा सक्षम असल्याचा दावा केला आहे. लसीची ने-आण करण्यासाठी लागणारी वातानूकुलीत वाहतूक यंत्रणा असल्याचेही सांगण्यात आले.

क्लेयर जाबोइवा यांच्या मते हैकर्सचे इमेल वाचून कोणीही आश्चर्यच व्यक्त करेल ; कारण कोरोना लस ६ महिने सुरक्षित सप्लाय करण्यासाठीची माहीती इतकी परिपूर्ण होती की त्यासाठी लागणाऱ्या फ्रिज, गाड्या, सौर उर्जा पैनल्स, इत्यादीची तांत्रिक तसेच किंमतीसहित अगदी खडा न् खडा अचूक माहीती होती.

जर यातली एकही कंपनी या हैकर्सच्या जाळ्यात सापडली असती तर कदाचित कोरोना लसीचे पुरेसे उत्पादन हातात असूनही तुटवडा निर्माण झाला असता. लसीच्या वितरणाची संपूर्ण साखळीच उद्ध्वस्त झाली असती. त्यामुळे लसीचं उत्पादन आणि प्राथमिकता जितकी महत्वाची तितकीच महत्वाची लसीची सुरक्षा आहे.

मानवी इतिहासातील सर्वाधिक प्रतिक्षा असलेलं एखादं उत्पादन कोणतं असेल तर ती कोरोनाची लस आहे.

 

 

 

अंकुश हंबर्डे पाटील

मिडिया भारत न्यूज चे वृत्तसंपादक तसंच कायद्याने वागा लोकचळवळीचे नांदेड जिल्हा समन्वयक


MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!