मुख्यमंत्री महोदय, सरसकट लाॅकडाऊन नको !

मुख्यमंत्री महोदय, सरसकट लाॅकडाऊन नको !

मुख्यमंत्री महोदय, सरसकट लाॅकडाऊन नको !

सरसकट टाळेबंदीला ( lockdown) माझा सशर्त विरोध असेल. नियम काटेकोरपणे पाळले नाही तर काय लावायचा तो दंड लावा. वेळापत्रक, P1, P2 काय वाटेल ते करा (गरज आणि परिस्थिती बघून) पण सरसकट lockdown म्हणजे पुन्हा भरत आलेल्या जखमा ताज्या होतील आणि आता तर ती जखम चिघळेल !

मागच्या lockdown चे नुकसान अजून भरले गेले नाहीत. आता काही तरी परिस्थिती सावरले असे वाटत असतांनाच पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढला. आम्हा लहानसहान व्यापाऱ्यांवर अजूनही व्याजाची, EMI ची, पगाराची, वाढत्या महागाईतला घर खर्च, शैक्षणिक खर्च, आरोग्यखर्च, दुकानभाड्याची टांगती तलवार आहेच.

आता जर प्रदीर्घ किंवा अनिश्चित lockdown लागला तर आमचा बाजार उठायला जास्त वेळ लागणार नाही.

तरी कृपया ज्यांची रोज कमाओ, रोज खावो अशी परिस्थिती आहे त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. एक कमावता माणूस बेजार झाला तर कमीत कमी 4 तरी व्यक्तींचे आर्थिक, मानसिक नुकसान होते.

तरी आमचे शासना कडे निवेदन आहे की संपूर्ण lockdown लावतांना आमच्या सारख्या करोडो लोकांचा विचार करावा.

शासकीय, निमशासकीय, corporate, limited कंपन्या यांच्या कर्मचाऱ्यांवर म्हणावा तसा फरक पडत नाही, त्यांना आर्थिक शास्वती तरी असते, पण आमच्या सारख्यांचे काय?

 

 

 

नीतिन महाजन

छपाई व्यावसायिक, उल्हासनगर

MediaBharatNews

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!