जय भवानीचा जयघोष सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केला?

जय भवानीचा जयघोष सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केला?

जय भवानीचा जयघोष सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केला?

महाराष्ट्रात 'जय शिवाजी, जय भवानी' ही घोषणा सर्वतोमुखी आहे. सार्वजनिक कार्यक्रमात, सभासमारंभात, मिरवणुकांतून हा जयघोष आपल्याला ऐकायला मिळतो. अंगावर रोमांच उभा करणारा उर्जादायी असा हा जयघोष सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केला, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या फेसबुकवरून सदिच्छा देताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणतात की या निमित्ताने काही ऐतिहासिक तथ्यांचा उलगडा होणं गरजेचं आहे. आंबेडकरी चळवळ व शिवाजी महाराज हे नातं जुनं आहे, अशी मांडणी करतानाच, 'जय भवानी' ही घोषणा सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली असल्याच ॲड. आंबेडकर सांगतात.

परळच्या दामोदर हॉल येथे बाबासाहेबांना भेटायला येणारे लोकं हे एकमेकांना ‘जय भवानी’ असं अभिवादन करत असत. त्याकाळी बाबासाहेबांच्या अधिकृत लेटर हेडवर भवानीचं चित्र असे, या आपल्या म्हणण्यापृष्ठ्यर्थ ॲड. प्रकाश आंबेडकरांनी बाबासाहेबांची जुनी लेटरहेडसुद्धा पोस्ट केली आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रहाच्या वेळी शिवाजी महाराज, महात्मा फुले व गांधीजींच्या प्रतिमा ठेवल्या होत्या. महाड सत्याग्रहाच्या वेळी दासगाव ते महाडपर्यंत निघालेल्या जमावाने "शिवाजी महाराज", "राजमाता जिजाऊ" यांचा जयजयकार करायला सुरुवात केली होती. ही माहिती देत, ॲड. आंबेडकरांनी शिवरायांचं काॅपीराईट स्वत:कडे असल्याचं समजणाऱ्यांना टोलाही लगावलाय की ठेकेदारांनो जरा वाचायला शिका!

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!