पतंजलीचं औषध प्रमाणित करणाऱ्या डॉक्टराविरोधात लैंगिक अत्याचाराचे गुन्हे !

पतंजलीचं औषध प्रमाणित करणाऱ्या डॉक्टराविरोधात लैंगिक अत्याचाराचे गुन्हे !

पतंजलीचं औषध प्रमाणित करणाऱ्या डॉक्टराविरोधात लैंगिक अत्याचाराचे गुन्हे !

पतंजलीचे पाठीराखे जरी मोठ्या संख्येने असले तरी टीकाकारही तितक्याच संख्येने आहेत. टीकाकारांना रामदेव बाबा हा माणूस बनावट वाटतो. आता कोविडवर उपचार म्हणून औषध शोधल्याचा दावा पतंजलीने केल्यानंतर ते औषध प्रमाणित करणारा डॉक्टरांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. पतंजलीच्या या कथित संशोधक डाॅक्टराविरोधात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत.

पतंजली आणि राजस्थानच्या निम्स विद्यापीठाने कोरोनावर औषध शौधल्याचा दावा केला. २३ जून २०२० रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत पतंजलीचे आचार्य बालकृष्ण यांनी निम्स विद्यापीठाचे चेअरमन डॉ.बलविर सिंह तोमर यांना करोनिल औषध बनविण्यासाचे श्रेय दिले एवढ्यावरच न थांबता त्यांनी डॉक्टरांचे कौतूक करताना डॉ.बलविर सिंह यांनी लंडनच्या किंग्स कॉलेज अॉफ मेडिसीन मधून अभ्यास केल्याचेही सांगितले तसेच हॉवर्ड विद्यापीठात संशोधक म्हणून काम केल्याचा पतंजलीने उल्लेख केला.

पण पतंजलीने सोयिस्कररित्या डॉक्टर बलवीर सिंह तोमर यांची गुन्हेगारी पाश्वभूमी लपवली. ६ फेब्रुवारी २०१५ रोजी निम्सचे चेअरमन तथा न्यूज इंडियाचे मालक असलेल्या ह्या डॉ.बलवीर सिंह तोमर यांच्यावर मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दीड वर्षानंतर २०१६ मध्ये त्यांना अटकही झाली होती.त्यांच्यावर रांची येथील चुटिया पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३७६ (सी), ५११, ३५४, ३५४ (ए), ३५६ बी आणि ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.

News by MediaBharatNews

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create AccountLog In Your AccountDon`t copy text!