उल्हासनगरातील वीजपुरवठा लवकरच अंबरनाथऐवजी उल्हासनगरातूनच !

उल्हासनगरातील वीजपुरवठा लवकरच अंबरनाथऐवजी उल्हासनगरातूनच !

उल्हासनगरातील वीजपुरवठा लवकरच अंबरनाथऐवजी उल्हासनगरातूनच !

अंबरनाथ विधान सभा क्षेत्रातील उल्हासनगर-४ आणि उल्हासनगर-५ व प्रभाग १८ मधील वीजपुरवठ्याशी संबंधित तक्रारीचं निवारण करताना किमान पुढची दहा वर्षं त्रास होणार नाही, अशा उपाययोजना आखण्याचं आश्वासन महावितरणचे कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उल्हासनगर शहर महासचिव रोहित साळवे यांना दिलंय.

महावितरण संबंधित नागरिकांना भेडसावत असलेले प्रश्न व प्रलंबित कामं पूर्ण करण्याबाबत रोहित साळवे यांनी महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट घेतली होती. सदरबाबत तात्काळ बैठक लावण्याची सूचना मंत्रीमहोदयांनी कल्याण परिमंडळचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांना केली होती. त्या अनुषंगाने, महावितरणच्या कल्याण कार्यालयात अग्रवाल यांच्या उपस्थितीत सर्व संबंधित विभाग अधिकारांच्या समक्ष बैठक संपन्न झाली. उल्हासनगर महापालिकेतील काँग्रेस गटनेत्या अंजली साळवे याही यावेळी उपस्थित होत्या.

 

गायकवाड पाडा येथे प्रस्तावित सबस्टेशनचं काम लवकर पूर्ण करण्यात यावे, उल्हासनगर-४ साठी नवीन स्विचिंग स्टेशन कुर्ला कॅम्प येथील लालसाई गार्डनच्या बाजूला असलेल्या खुल्या भूखंडावर किंवा स्वर्गद्वार स्मशानभूमीच्या भूखंडावर उभारण्यात यावं, उल्हासनगर शहरातील भारतनगर, सुभाषटेकडी, लालचक्की इत्यादी भागात अंबरनाथ वरून विद्युत पुरवठा होतो, तो बदलून उल्हासनगरमधून करण्यात व्हावा, शहरातील नागरिकांना लॉकडाऊनच्या अनुषंगाने वीजबिलांमध्ये सवलत देण्यात यावी, प्रभाग १८ मधील हनुमान मंदिर परिसरात, सुभाष टेकडी परिसरात नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावेत, तसंच कालीमाता मंदिर परिसरातील ट्रान्सफॉर्मेरची क्षमता वाढविण्या यावी, प्रभाग १८ मधील सर्व जीर्ण व जुने झालेले वायरिंग आणि मिनी-पिलर्स बदलण्यात यावेत, सुभाष टेकडी व भारतनगर परीसर जो महावितरण विभागाच्या तुटवड्यामुळे ”ड” श्रेणीत आहे, त्यासाठी सर्वे करून वीजचोरीसाठी अभियान चालवून सदर विभागाला ”ब” श्रेणीत घेण्यात यावं, आर एन्ड एम योजनेतील ठेकेदारांवर अंकुश लावून प्रलंबित कामं करून घेण्यात यावीत किंवा ठेकेदार बदलण्याची कारवाई व्हावी, अशा विविध मागण्यांवर बैठकीत चर्चा झाली.

उपरोक्त मागण्यांच्या पूर्ततेचे आश्र्वासन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी दिले, तसंच तातडीची कामं दहा दिवसांत सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बैठकीला महावितरणकडून मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, अधिक्षक अभियंता धर्मराज पेठकर, कार्यकारी अभियंता अशोक सावंत, उप कार्यकारी अभियंता विपर व इतर संबंधित कर्मचारी तसंच काँग्रेस गटनेता नगरसेविका अंजली साळवे , महासचिव रोहित साळवे व समाजसेवक संजय पाटील उपस्थित होते.

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!